शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

ललिता बाबरला आॅलिम्पिकचे तिकीट

By admin | Updated: June 7, 2015 00:57 IST

२१ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ललिता बाबर हिने ३००० मीटर स्टेपलचेजमध्ये एकहाती वर्चस्व राखताना सुवर्णपदकाची

वुहान : २१ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ललिता बाबर हिने ३००० मीटर स्टेपलचेजमध्ये एकहाती वर्चस्व राखताना सुवर्णपदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या कामगिरीसह तीने पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठीदेखील पात्रता मिळवली आहे. त्याचवेळी थाळीफेकीमधील भारताचा हुकमी खेळाडू विकास गौडानेदेखील आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव कोरले.ललिताने सुवर्ण मिळवताना ९: ३३.१३ सेकंदांची जबरदस्त वेळ नोंदवताना सुवर्णपदाकासहितच नवा राष्ट्रीय विक्रमदेखील प्रस्थापित केला. दखल घेण्याची बाब म्हणजे बहारीनची अव्वल धावपटू रुथ चेबेटच्या माघारीनंतर ललिताला या स्पर्धेत संभाव्य विजेती मानले जात होते आणि ललिताने त्याच तोडीची कामगिरी केली. दरम्यान इंचिओन आशियाई स्पर्धेमध्ये ललिताला मागे टाकून रौप्य पटकावणाऱ्या चीनच्या ली झेनसूला ९ मिनिटे ४१.३६ सेंकद अशा कामगिरीसह द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे एकप्रकारे ललिताने यावेळी लीचा वचपादेखील काढला. तर, झांग शियान हिने ९ मिनिटे ४६.८२ सेकंदासोबत तिसरे स्थान पटकावले. याआधी ललिताचा विक्रम ९ मिनिटे ३५.३७ सेकंदांचा होता. हा विक्रम तीने ग्लास्गोत २०१४ मध्ये राष्ट्रकुल खेळादरम्यान केला होता. दुसऱ्या बाजूला विकास गौडाने देखील आपली छाप पाडताना भारताला थाळीफेकमध्ये सुवर्ण मिळवून दिले. विशेष म्हणजे गतस्पर्धेतदेखील सुवर्ण पटकावलेल्या विकासने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखले. अजूनपर्यंत रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र न ठरलेल्या गौडाने ६२.०३ मीटर फेक करताना बाजी मारली. दखल घेण्याची बाब म्हणजे या वर्षी दोनवेळा विकासने ६५ मीटरहून अधिक अंतराची फेक केली असल्याने ही कामगिरी निश्चितच त्याच्या लौकिकास साजेशी नव्हती. मात्र तरीदेखील त्याने सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले. कुवेतच्या इशा जनकावी (६१.५७ मि) आणि इराणच्या महमूद समीमी (५९.७८ मिनिटे) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली. अन्य स्पर्धेत भारताच्या जी. लक्ष्मणने १० हजार मीटरमध्ये २० मिनिटे ४२.८१ सेकंदांच्या वेळेसह रौप्य पदक जिंकले. (वृत्तसंस्था)