शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

ललित मोदींनी दिली फिक्सर खेळाडूंची माहिती

By admin | Updated: June 29, 2015 01:14 IST

आयपीएलचे माजी वादग्रस्त आयुक्त ललित मोदी यांनी क्रिकेट फिक्सिंगमध्ये सहभाग असलेल्या तीन मोठ्या क्रिकेटपटूंचे नाव उघड करुन एकच खळबळ माजवली आहे.

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी वादग्रस्त आयुक्त ललित मोदी यांनी क्रिकेट फिक्सिंगमध्ये सहभाग असलेल्या तीन मोठ्या क्रिकेटपटूंचे नाव उघड करुन एकच खळबळ माजवली आहे. यामधील दोन खेळाडू भारतीय असून एक खेळाडू वेस्ट इंडिजचा आहे. या तिन्ही खेळाडूंना एका रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठ्या उद्योगपतीने लाच दिल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे.लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मोदी यांनी एक पत्र ट्वीट केले असून, हे पत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सीईओ डेव रिचडर््सन यांना जून २०१३ मध्ये पाठवले असल्याचा दावा केला आहे. शिवाय या पत्रामध्ये त्यांना तथ्य वाटत असेल तर त्यांनी ते पत्र आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा समितीला द्यावे असेही सांगितले. यानंतर मोदी यांनी त्या तीन मोठ्या खेळाडूंचे नाव जाहीर करुन खळबळ उडवून दिली असून, हे तिन्ही खेळाडू एका मोठ्या रिअल इस्टेट उद्योगपतीच्या संपर्कात असल्याचा दावा केला. तसेच हा उद्योगपती मोठा सट्टेबाज असल्याचा दावा देखील मोदी यांनी केला आहे. मोदी यांनी याबाबत सांगितले की, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये या उद्योगपतीने या तिन्ही खेळाडूंना रोख रक्कम व इतर स्वरुपात लाच दिली आहे. तसेच ही माहिती खोटी असेल अशी आशा करतो, मात्र जर का यात तथ्य असेल तर याचा अर्थ असा आहे की यामध्ये अजूनही अनेकांचा समावेश असू शकतो, असेही मोदी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)२०१३ मध्ये ललित मोदींचा ई-मेल मिळाला होता : आयसीसीदुबई : ललित मोदी यांनी २०१३ मध्ये पाठविलेला ई-मेल मिळाला होता, असे आयसीसीतर्फे आज स्पष्ट करण्यात आले. त्यात मोदी यांनी तीन खेळाडूंना एका उद्योगपतीने लाच दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.सध्या लंडनमध्ये असलेल्या मोदी यांनी शनिवारी एक पत्र टिष्ट्वट केले. त्यात त्यांनी दावा केला आहे की, हे पत्र जून २०१३ मध्ये आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठविले होते. त्यात दोन भारतीय खेळाडू व एका वेस्ट इंडियन खेळाडूने एका उद्योगपतीकडून रोख रक्कम व मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. आयसीसीने आपल्या वेबसाईटवर ई-मेलबाबत स्पष्ट केले आहे की, त्यावेळी नियमानुसार कारवाई करण्यात आली होती. आयसीसीने म्हटले आहे की, ‘ललितकडून २०१३ मध्ये मेल मिळाला होता. हा मेल भ्रष्टाचार विरोधी व सुरक्षा समितीला पाठविण्यात आला. एसीएसयूने आपल्या पद्धतीनुसार याची चौकशी केली. त्यात बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी समितीसोबत चर्चा करण्याचाही समावेश होता.’