शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ललिताने केला सुवर्णासह शेवट गोड

By admin | Updated: February 14, 2015 00:24 IST

महाराष्ट्राच्या ललिता बाबरने महिलांच्या ३ हजार मीटर स्टेपचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शेवट गोड केला. १

तिरुअनंतपूरम : महाराष्ट्राच्या ललिता बाबरने महिलांच्या ३ हजार मीटर स्टेपचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शेवट गोड केला. १३ व्या दिवशी महाराष्ट्र संघाला एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कास्यपदकांवर समाधान मानावे लागले. रांची येथील स्पर्धेत पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या महाराष्ट्राला यावेळी चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.अ‍ॅथलेटिक्स : महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात इचियोन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कास्यपदकविजेती ललिता बाबरने शर्यतीच्या सुरुवातीपासून वर्चस्व राखत आघाडी घेतली होती. तिने ही शर्यत ९ मिनिटे ४२.६३ सेकंदाची वेळ नोंदवून आपल्या संघाला या क्रीडाप्रकारातील शेवटचे सुवर्ण जिंकून दिले. याच प्रकारात जयश्री बोरगीने शर्यत १० मि. ०४.३० से. पूर्ण करून कास्य तर पुरुषांच्या याच क्रीडाप्रकारात सचिन पाटीलने ९ मि. ००.२७ सेकंदाची वेळ नोंदवून कास्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये लियोन टी., सनी पाटील, दत्ता झोडगे व किरण डोइफोडे यांच्या जिगरबाज पळतीमुळे आपल्या संघाला कास्यपदक जिंकून दिले. कबड्डी : महाराष्ट्राच्या महिला संघाना अंतिम फेरीत हरियानाकडून १७-२० गुणांनी पराभव पत्करावा लागला. लढतीच्या शेवटच्या तीन मिनिटांत महाराष्ट्राच्या महिलांनी आतताईपणा केल्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाकडून सायली केरीपाळे, सुवर्णा बारटक्के, मीनल जाधव, अभिलाषा म्हात्रे व स्नेहल शिंदे यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. तायक्वाँदो : महाराष्ट्राच्या अंकिता पाटीलने ४९ किलो गटात कास्यपदक जिंकले. वुशू : महाराष्ट्राच्या श्रावणी कटकेने जियान वुशू प्रकारात ७.०३ गुण संपादन करून कास्यपदक जिंकले. रग्बीमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला अंतिम फेरीत ५-१७ गुणांनी पराभव पत्करावा लागला. त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)