शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

कुंटे, केळकर, गागरे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र

By admin | Updated: July 20, 2016 17:51 IST

ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकर आणि ग्रँडमास्टर शार्दूल गागरे या तीन महाराष्ट्राच्या बुद्धिबळपटूंनी आगामी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता साध्य केली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 20 -  ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकर आणि ग्रँडमास्टर शार्दूल गागरे या तीन महाराष्ट्राच्या बुद्धिबळपटूंनी आगामी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता साध्य केली आहे. नोएडा (नवी दिल्ली) येथे झालेल्या राष्ट्रीय चॅलेंजर स्पर्धेत ग्रॅँडमास्टर अभिजित कुंटेने चौथे, इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकरने पाचवे, तर ग्रँडमास्टर शार्दूल गागरेने आठवे स्थान संपादन केले. पहिले नऊ खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेला पात्र ठरले. एस. रवितेजाने सर्वाधिक दहा गुणांसह विजेतेपद जिंकले. अखेरच्या १३ व्या फेरीत त्याने के. सूर्यप्रणीताशी बरोबरी साधली. दुसऱ्या पटावर कुंटेने ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमला बरोबरीत रोखले. तिसऱ्या पटावर केळकरने धक्कादायक निकालाची नोंद केली. त्याने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा घेत ग्रँडमास्टर एस. एल. नारायणनला पराभूत करून सर्वांना आर्श्चयचकीत केले. केळकरचे एलो रेटिंग २३८०, तर नारायणनचे २५१५ आहे. या विजयामुळे केळकरला पाचव्या क्रमांकापर्यंत मजल मारता आली. गागरने संतू मोंडलला पांढऱ्या मोहऱ्यांसह हरविले. राष्ट्रीय स्पर्धा लखनौमध्ये आहे. अंतिम क्रमवारी : एस. रवितेजा (१०), डी. बी. चंद्रप्रसाद, के . सूर्यप्रणीत, अभिजित कुंटे, अभिषेक केळकर (प्रत्येकी ९.५), एस. नितीन, आर. आर. लक्ष्मण, शार्दूल गागरे, अरविंद चिदंबरम (प्रत्येकी ९); प्रमुख निकाल : रवितेजा बरोबरी वि. सूर्यप्रणीत. कुंटेबरोबरी वि. अरविंद. केळकर विवि एस. एल. नारायणन. चंद्रप्रसाद विवि व्ही. विष्णू प्रसन्न. लक्ष्मण बरोबरी वि. तेजस बाकरे, शार्दूल विवि संतू मोंडल.