शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीकडून इयान हिलीची 'पोल खोल', युट्यूब सर्च करा सर्व कळेल

By admin | Updated: March 8, 2017 16:27 IST

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर शेरेबाजी करण्यासाठी ओळखलं जातं. मात्र, जेव्हा त्यांच्यासोबत कोणी असा व्यवहार करतं तेव्हा ते त्याला खेळभावनेच्या विरोधात ठरवतात.

ऑनलाइन लोकमत  
बंगळुरू, दि. 8 - ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर शेरेबाजी करण्यासाठी ओळखलं जातं. मात्र, जेव्हा त्यांच्यासोबत कोणी असा व्यवहार करतं तेव्हा ते त्याला खेळभावनेच्या विरोधात ठरवतात. बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यावरही अशीच घटना झाली. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक इयान हिली यांनी विराट कोहलीच्या आक्रमकतेवर टीका केली होती. विराट कोहलीकडून सातत्याने होत असलेल्या स्लेजिंगमुळे मी त्याच्याप्रति असलेला सन्मान गमावला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर  विराटने युट्युबवर असलेल्या एका व्हिडीओचं उदाहरण देत इयान हिलीला प्रत्युत्तर दिलं.
 
एका व्यक्तीच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही, माझ्यासाठी भारतीय चाहते महत्वाचे आहेत. जो व्यक्ती स्वतःच वादात राहिलाय त्याचं मला महत्व वाटत नाही असं कोहली म्हणाला. सर्वांनी युट्यूबवर असलेला 1997 साली सेंच्यूरिअनमध्ये झालेल्या कसोटीचा व्हिडीओ बघावा असं मला वाटतं त्यामधून सर्व स्पष्ट होतं असं कोहली म्हणाला. 
काय होती 1997 च्या सेंच्यूरिअन कसोटीतील घटना-
युट्यूबवर असलेल्या एका व्हिडीओकडे कोहलीने लक्ष वेधलं. 1997 मध्ये सेंच्यूरिअन कसोटीत लेग स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर अंपायरने हिली यांना बाद ठरवलं होतं. त्यावर हिलीने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मैदानाबाहेर येताना त्याने आपली बॅट देखील फेकून दिली होती. त्यानंतर हिलीवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.