शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीने गळा कापण्याचा इशारा केला

By admin | Updated: March 11, 2017 02:07 IST

बंगलोर कसोटीमध्ये सुरू झालेल्या ‘डीआरएस’ खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ'ने भारतीय संघाचा कर्णधार

मुंबई : बंगलोर कसोटीमध्ये सुरू झालेल्या ‘डीआरएस’ खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ'ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोहलीला पायचित दिल्यानंतर कुंबळे रागाच्या भरात पंचांच्या रुममध्ये गेला आणि विराटला बाद का दिले, याबाबत स्पष्टीकरण मागितले, तर मॅच संपल्यानंतर कोहलीने आॅस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांवर शीतपेयाची बाटली फेकली. त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला, असा आरोप ‘टेलीग्राफ’ने केला आहे. बाद झाल्यानंतर कोहलीने एनर्जी ड्रिंकची बाटली टेबलावर फेकली ती आॅस्ट्रेलियाच्या एका अधिकाऱ्याला लागली. कुंबळेने जाणूनबुजून सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने हे प्रकरण ‘आयसीसी’कडे नेले. याशिवाय विराट कोहलीने आॅस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हँड्सकॉम्बला गळा कापण्याचा इशारा केला होता, असा गंभीर आरोपही वृत्तपत्राने केला आहे. कोहली श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगानंतर सर्वांत खराब कर्णधार असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)काय आहे प्रकरणबंगलोर कसोटीच्या दुसऱ्या डावाच्या एकविसाव्या षटकांत तिसऱ्या चेंडूवर आॅस्ट्रेलियाचा कणर्धार स्टिव्ह स्मिथ पायचित झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी अनियमितपणे उसळी घेणाऱ्या या खेळपट्टीवर बराच खाली राहिलेला तो चेंडू सरळ यष्ट््यांचा वेध घेणारा होता. त्यामुळे पंचांनीही क्षणाचाही वेळ न घेता त्याला बाद ठरविले. चेंडू स्मिथच्या पायाला लागताच भारतीय खेळाडूंनीही जल्लोष करायला सुरूवात केली. मात्र, त्यावेळी आॅस्ट्रेलियाकडे तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याच्या (डीआरएस) दोन्ही संधी उपलब्ध होत्या. आपण आऊट आहोत की नाही याबाबत स्मिथला शंका होती. त्यामुळे रिव्ह्यू घ्यावा की नाही हे विचारण्यासाठी स्मिथ नॉनस्ट्राईकला असलेल्या पिटर हॅन्डसकॉम्बकडे गेला; पण तेथून तो आॅस्ट्रेलियाचे खेळाडू बसलेल्या ड्रेसिंग रुमकडे पाहत होता, आणि तेथून त्याला कांगारूंचे खेळाडू इशारे करीत होते. पंचांच्याही हे ध्यानात आले. ते स्मिथकडे पोहोचले आणि तू असे करू शकत नाहीस, असे ते त्याला म्हणाले. दरम्यान, भारतीय संघातील खेळाडू चांगलेच भडकले. जर स्मिथने रिव्ह्यू घेतला असता तर आॅस्ट्रेलियाचा एक रिव्ह्यूही वाया गेला असता. भारतीय खेळाडूंनी त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. खेळाडूंचा वाढता आक्रोश पाहून पंचांनी मध्यस्थी केली आणि स्मिथला जायला सांगितले.