शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोहली भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार

By admin | Updated: February 14, 2017 00:17 IST

फलंदाजीव्यतिरिक्त नेतृत्वामध्ये रोज नवे विक्रम नोंदविण्याच्या दिशेने वाटचाल करणारा विराट कोहली सोमवारी भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार

हैदराबाद : फलंदाजीव्यतिरिक्त नेतृत्वामध्ये रोज नवे विक्रम नोंदविण्याच्या दिशेने वाटचाल करणारा विराट कोहली सोमवारी भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. तो सर्वांधिक कसोटी सामन्यांत अपराजित असलेला भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताने सोमवारी बांगलादेशचा एकमेव कसोटी सामन्यात २०८ धावांनी पराभव केला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा १५ वा कसोटी विजय ठरला आहे. कर्णधार म्हणून २३ वा कसोटी सामना खेळणाऱ्या कोहलीने मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने ४७ सामन्यांत १४ विजय मिळवले. कोहली आता भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. महेंद्रसिंग धोनी (६० सामन्यांत २७ विजय) आणि सौरव गांगुली (४९ सामन्यांत २१ विजय) त्याच्या तुलनेत आघाडीवर आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पहिल्या २३ कसोटी सामन्यांत कोहलीपेक्षा अधिक विजय केवळ आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉने (१७ विजय) मिळवले आहेत. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला गेल्या १९ कसोटी सामन्यांत एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. भारतासाठी हा नवा विक्रम आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १८ सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे. सर्वाधिक काळ अपराजित राहण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या (२७ सामने) नावावर आहे. भारताने सलग सहाव्या कसोटी मालिकेत विजय मिळवला. आॅगस्ट २०१५ पासून भारताने एकही मालिका गमावलेली नसून, हा भारतासाठी नवा विक्रम आहे. (वृत्तसंस्था)