शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कोहली, धोनीत ‘आॅल इज वेल’!

By admin | Updated: January 3, 2015 01:48 IST

रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यातील वाढत्या जवळिकीमुळे महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतल्याच्या बातम्यांचे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी खंडन केले.

शास्त्रींची स्पष्टोक्ती : या दोघांमधील वादाचे केले खंडननवी दिल्ली : रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यातील वाढत्या जवळिकीमुळे महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतल्याच्या बातम्यांचे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी खंडन केले. कोहली आणि धोनी यांच्यात कोणताही वाद नसून, ‘आॅल ईज वेल’असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. या सर्व अफवा असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आॅस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसह भारतीय संघाने टी-पार्टी केली. त्यानंतर शास्त्री म्हणाले, विराटसह संघाचे इतर खेळाडूच नव्हे, तर संघाचे सहायक स्टाफही धोनीचा सन्मान करतात. कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेण्याच्या धोनीच्या निर्णयाने सर्वांना अचंबित केले. ड्रेसिंग रूममधील वादांमुळेच धोनीने ही निवृत्ती घेतल्याच्या चर्चांना उधाण आले. धोनीच्या निवृत्तीबाबत शास्त्री म्हणाले, हा निर्णय मलाही अचंबित करणारा होता; परंतु हा धाडसी निर्णय होता. माझ्या दृष्टिकोनातून धोनीने यशाची उंची गाठली आहे आणि त्याला १०० कसोटी खेळून स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. त्याला कुठल्या निरोप समारंभाचीही गरज नाही. कोहली आणि शिखर धवन यांच्यातील वादाच्या बातम्याही निराधार असल्याचे सांगून शास्त्री म्हणाले, ही चुकीची बातमी आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये कोणताही वाद नाही. गेल्या पाच वर्षांपासून कोहली संघाचा सदस्य आहे आणि संघातील इतर खेळाडूंना त्याच्या सोबतीची सवय आहे. संघातील अनेक खेळाडू १९ वर्षांखालील संघात एकत्र खेळले आहेत.गोलंदाजीत सुधारणा आवश्यक४भारतीय संघाच्या गोलंदाजांना सलग सामन्यांत २० विकेट घेण्याचे तंत्र विकसित करण्याची आवश्यकता आहे. आॅस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत दोन्ही संघांच्या गोलंदाजांमध्ये मोठे अंतर पाहायला मिळाले. आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांकडे अनुभव असून, भारतीय गोलंदाज त्यात कमी पडतात. ४भविष्यात खूप काम करायचे आहे. सर्वांत आधी गोलंदाजी प्रभावशाली बनविण्याच्या दिशेने काम सुरू करणार असून, २० विकेट घेण्याच्या तंत्राचा विकास करण्यासाठी पावले उचलली जातील. आमच्याकडे युवा खेळाडूंची फौज आहे.शास्त्रींकडून विराटचा बचावया मालिकेत फलंदाजीमुळेच नव्हे, तर मैदानावरील शाब्दिक चकमकींमुळे विराट कोहली चर्चेत राहिला. मिशेल जॉन्सनवर केलेल्या टीकेवरील प्रश्नावर शास्त्री म्हणाले, हे विराटचे व्यक्तिमत्त्व आहे. तो आक्रमक आणि रागीट आहे. वयाच्या २६व्या वर्षी तो संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारत आहे. हा एक युवा संघ असून, लवकरच प्रशंसनीय कामगिरी करेल.आता नजर कोहलीवर४भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तीन दिवसांनी आता पूर्ण लक्ष नवा कसोटी कर्णधार विराट कोहलीवर केंद्रित झाले आहे. विराट ६ जानेवारीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.४धोनी आता मैदानात व मैदानाबाहेरही दिसेनासा झाला आहे. आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टॉनी एबोट यांनी उभय संघांसाठी रविवारी आयोजित केलेल्या टी पार्टीमध्येही धोनी सहभागी झाला नव्हता. धोनीने निवृत्ती स्वीकारल्यामुळे आता तो कसोटी संघाचा सदस्य नाही, पण त्याला आमंत्रण देण्यात आले होते. त्याच्या अनुपस्थितीत कोहली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कोहलीने आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ व एबोट यांच्यासोबत छायाचित्रे काढली. ४धोनीच्या निवृत्तीपूर्वीही आॅस्ट्रेलियामध्ये कोहली चर्चेत होता. त्याने अ‍ॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषविले. आॅस्ट्रेलियन खेळाडूंसोबत त्याचे अनेकदा वाद झाले. ४आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डेमियन फ्लेमिंग म्हणाला,‘विराट आक्रमक आहे. मला जर त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली असती तर मी स्लेजिंगचा आधार घेतला नसता. कारण त्याचा तो आपल्याविरुद्ध वापर करू शकतो.’४पहिल्या कसोटी सामन्यात दोन शतके ठोकणाऱ्या कोहलीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचविले होते. फ्लेमिंगच्या मते कोहली माजी कर्णधाराच्या तुलनेत सरस ठरेल. फ्लेमिंग म्हणाला,‘धोनी मैदानावर अधिक आक्रमक भासत नव्हता. कोहली प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. कोहली सचिन तेंडुलकर व अडम गिलख्रिस्ट यांच्या तुलनेत वेगळा आहे. ते स्लेजिंगवर कधीच प्रतिक्रिया देत नव्हते. त्यांना कुणीच काही म्हणत नव्हते आणि एखाद्याने काही म्हटले तरी त्यावर त्यांची प्रतिक्रिया मिळत नव्हती. सचिन रागाने लालबुंद होत होता पण मैदानावर मात्र त्याच्याकडून कधीच प्रतिक्रिया मिळत नव्हती. कोहली वेगळा असून खेळासाठी ते योग्य आहे. ’४धोनीबाबत चर्वितचर्वण बंद झाले आहे. धोनी संघासोबत असून आॅस्ट्रेलियात थांबणार असल्याचे संकेत मिळत आहे. तिरंगी मालिकेला अद्याप १६ दिवसांचा अवधी शिल्लक आहे.