शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

कोहली सर्वश्रेष्ठ फलंदाज

By admin | Updated: November 13, 2016 02:33 IST

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा विध्वंसक फलंदाज एबी डिव्हीलियर्स आणि इंग्लंडचा जो रुट जगातील सर्वश्रेष्ठ तीन फलंदाज आहेत

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा विध्वंसक फलंदाज एबी डिव्हीलियर्स आणि इंग्लंडचा जो रुट जगातील सर्वश्रेष्ठ तीन फलंदाज आहेत, असे मत आॅस्टे्रलियाचा माजी धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने व्यक्त केले. आॅस्टे्रलियाच्या शिक्षण प्रतिनिधी मंडळासह कर्नाटकाच्या मणिपाल दौऱ्यावर आलेल्या गिलिख्रिस्टने सांगितले, ‘‘मी सध्या भारतात आहे म्हणून असे बोलत नाही. तर, ही वस्तुस्थिती आहे की विराट, एबी आणि रुट अव्वल तीन फलंदाज आहेत.’’ त्याचबरोबर, गिलख्रिस्टने श्रीलंकेचा माजी दिग्गज आॅफ स्पिनर मुथय्या मुरलीधरनला आतापर्यंतचा सर्वांत धोकादायक व आव्हानात्मक गोलंदाज म्हटले. गिलख्रिस्ट म्हणाला, ‘‘मुरली खूप कठीण गोलंदाज होता. त्याची गोलंदाजी समजणे सोपे नव्हते. त्याचे चेंडू सरळ येतील की वळतील, याचा काहीच अंदाज बांधता येत नसे. तो शानदार गोलंदाज होता.’’ शिवाय, भारताला भारतीय भूमीवर नमवणे कधीही सोपे नाही, असेही गिलख्रिस्टने या वेळी सांगितले. तसेच, त्याने विराटसह भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार एमएस धोनी, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आठवणींना उजाळा दिला. (वृत्तसंस्था)