शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कोच्ची टस्कर्सला आयपीएलमध्ये सहभाग हवा

By admin | Updated: July 9, 2015 01:14 IST

आयपीएलमध्ये सहभागी असलेला माजी संघ कोच्ची टस्कर्सला ५५० कोटींची नुकसानभरपाईची शिफारस करणाऱ्या माजी मुख्य न्या. आर. सी. लाहोटी यांच्या अहवालाला आव्हान देण्याची

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये सहभागी असलेला माजी संघ कोच्ची टस्कर्सला ५५० कोटींची नुकसानभरपाईची शिफारस करणाऱ्या माजी मुख्य न्या. आर. सी. लाहोटी यांच्या अहवालाला आव्हान देण्याची बीसीसीआयने तयारी केली आहे. कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०११मध्ये बीसीसीआयने या संघाला निलंबित केले होते. लवादाचा निर्णय कोच्चीच्या बाजूने आला आहे; पण कोच्ची संघ ५५० कोटी परत घ्यायच्या विचारात नसून, त्यांना यंदा आयपीएलमध्ये संघ खेळविण्याची इच्छा असल्याचे सूत्रांचे मत आहे.आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी संचालन परिषदेच्या बैठकीनंतर सांगितले, की लाहोटी अहवाल मिळाला आहे. या अहवालाला आव्हान द्यावे, असे अनेक सदस्यांचे मत पडले. कायदेशीर सल्ला घेत आहोत. बीसीसीआयने ही रक्कम न दिल्यास त्यावर १८ टक्के व्याजाची तरतूद आहे. बीसीसीआयने २०११ मध्ये कोच्ची संघाचा करार रद्द करून त्यांची बँक गॅरंटी स्वत:कडे घेतली होती. हे प्रकरण लाहोटी लवादाकडे गेले. चेन्नई सुपरकिंग्सच्या मूल्यांकनाचा निर्णय संचालन परिषदेने बोर्डाच्या कार्य समितीकडे सोपविला असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. कोलकाता येथील बोर्डाच्या मागच्या बैठकीत कार्य समितीने कायदेशीर सल्ला मागितला होता. कायद्यानुसार काय होऊ शकते, याची माहिती मिळाल्यानंतर संचालन परिषदेच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे शुक्ला म्हणाले.चॅम्पियन्स टी-२० लीगबाबतही कुठलाच निर्णय झाला नाही. सीएसए आणि सीएच्या उपस्थितीत हा निर्णय शक्य असल्याची माहिती शुक्ला यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘चॅम्पियन्स लीग बंद करण्याचा निर्णय घेतला नाही; पण त्यावर संचालन परिषद निर्णय घेईल. कारण संचालन परिषदेत सीएसए आणि सीएचा समावेश आहे. चॅम्पियन्स लीग दर वर्षी सप्टेंबरमध्ये होते; पण प्रायोजक आणि प्रेक्षकांमध्ये या लीगबाबत उत्साह नाही.’’(वृत्तसंस्था)