शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

केकेआरला पुण्याकडून आव्हानाची शक्यता

By admin | Updated: May 3, 2017 00:33 IST

पुण्याचा संघ अनेकबाबतीत वरचढ आहे. अजिंक्य रहाणेला गेल्या काही महिन्यांमध्ये बरेच काही करावे लागत आहे. एम. एस. धोनीला

- रवी शास्त्री - पुण्याचा संघ अनेकबाबतीत वरचढ आहे. अजिंक्य रहाणेला गेल्या काही महिन्यांमध्ये बरेच काही करावे लागत आहे. एम. एस. धोनीला आपल्या क्षमतेच्या तुलनेत फार कमी चाहत्यांपुढे सादर करता आले. फाफ डु प्लेसिसचा तर वापरच झालेला नाही. यानंतरही पुणे संघ प्लेआॅफच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पुणे असा संघ आहे, की त्यात समावेश असलेल्या सुपरस्टार खेळाडूंनी किमान एकदा तरी छाप उमटवली आहे. स्टीव्ह स्मिथने सुरुवातीला हा पराक्रम केला. धोनीने आपल्यातील फिनिशरची प्रचिती दाखविली. बेन स्टोक्सने लिलावामध्ये त्यावर लावण्यात आलेली मोठ्या रकमेची बोली योग्य असल्याचे सिद्ध केले. या खेळाडूंची उपस्थिती राहुल त्रिपाठी व शार्दुल ठाकूर यांच्यासारख्या खेळाडूंवर मोठा प्रभाव पाडणारी आहे. संघाला आता सूर गवसला आहे. प्रत्येक लढतीगणिक त्यांच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या त्यांच्या लढतीबाबत उत्सुकता आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाने जास्तीत जास्त लढती घाम न गाळता जिंकलेल्या आहेत. पुणे संघ त्यांच्यापुढे कडवे आव्हान निर्माण करू शकतो. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने कोलकाताच्या गोलंदाजांची पिसे विखुरली. त्या लढतीत कोलकाता संघाने लय गमावल्याचे दिसून आले. त्यांच्या फिरकीपटूंना छाप पाडता आली नाही. कोलकाताविरुद्धच्या लढतीत पुणे संघाला इनोव्हेटी फटके खेळण्याची क्षमता असलेल्या फलंदाजाची गरज आहे. या फलंदाजांमध्ये कुठलेही दडपण न बाळगता रिव्हर्स हिट किंवा रिव्हर्स स्वीप मारण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. गंभीर आपल्या गोलंदाजांसाठी नेहमी आक्रमक क्षेत्ररक्षण सजवितो. वॉर्नरची आक्रमक फलंदाजी सुरू असतानाही गंभीरने बचावात्मक पवित्रा स्वीकारला नाही. पुणे संघाला हे आव्हान स्वीकारावे लागेल आणि जशास तसे उत्तर द्यावे लागेल. पुणे संघाने यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सविरुद्ध दोनदा विजय मिळवला आहे. ईडनगार्डन्समध्ये मात्र त्याच्यापुढे मोठे आव्हान राहणार आहे.(टीसीएम)