शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

केकेआर-गुजरात लायन्सदरम्यान आज लढत

By admin | Updated: April 7, 2017 03:46 IST

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आयपीएलच्या दहाव्या पर्वात सलामीचा सामना आज शुक्रवारी गुजरात लायन्सविरुद्ध खेळणार आहे.

राजकोट : स्थानिक फलंदाजांवर विसंबून असलेला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आयपीएलच्या दहाव्या पर्वात सलामीचा सामना आज शुक्रवारी गुजरात लायन्सविरुद्ध खेळणार आहे. गुजरात संघात विदेशी फलंदाजांचा भरणा असल्याने ही लढत देशीविरुद्ध विदेशी फलंदाजांमधील चढाओढ, अशी मानली जाते.सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील लायन्सने गतवर्षी पदार्पणात साखळी फेरीत अव्वल स्थान पटकविले होते. पण, पात्रता फेरीत माघारल्याने तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ आघाडीच्या चार संघांत स्थान टिकविण्यात यशस्वी ठरला. गुजरातच्या फलंदाजी फळीत ब्रँडन मॅक्यूलम, ड्वेन स्मिथ, अ‍ॅरोन फिंच आणि रैना यांचा समावेश आहे. तिघांनी गतवर्षी ३०० वर धावा केल्या. दिनेश कार्तिक, ईशांत किशन आणि जेम्स फॉल्कनर हे बिग हिटर आहेत. जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो हे मात्र पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावरच खेळणार आहेत.गोलंदाजीत या संघाकडे धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, स्मिथ आणि फॉल्कनर, शादाब जकाती तसेच शिविल कौशिक यांचा पर्याय उपलब्ध असेल. केकेआरकडे फलंदाजीसाठी गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, इशांक जग्गी, युसूफ पठाण तसेच अष्टपैलू शाकिब अल हसन हे सरस खेळाडू आहेत. विंडीजचा बंदी असेला खेळाडू आंद्रे रसेल याची मात्र उणीव जाणवेल. कॅरेबियन फिरकी गोलंदाज सुनील नारायण हा मात्र संघासाठी उपयुक्त खेळाडू ठरू शकतो. (वृत्तसंस्था)