शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

किंग्ज इलेव्हनपुढे केकेआरचे आव्हान

By admin | Updated: April 19, 2016 03:36 IST

पुणे सुपरजायंट्सविरुद्ध पहिला विजय नोंदवणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला उद्या (मंगळवारी) इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या

मोहाली : पुणे सुपरजायंट्सविरुद्ध पहिला विजय नोंदवणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला उद्या (मंगळवारी) इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. किंग्ज इलेव्हनच्या गृहमैदानावर खेळल्या जाणाऱ्या या लढतीत केकेआरच्या अष्टपैलू खेळाडूंना रोखणे यजमान संघासाठी आव्हान ठरणार आहे. केकेआरने तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळवताना चार गुणांची कमाई केली आहे, तर किंग्ज इलेव्हनने रविवारी पुणे संघाविरुद्ध सहा गडी राखून सरशी साधताना विजयाचे खाते उघडले. कागदावर केकेआर संघ समतोल दिसत असून, किंग्ज इलेव्हनविरुद्ध या संघाचे पारडे वरचढ भासत आहे. टी-२०मध्ये मात्र संघाचे यश सामन्याच्या दिवशी झालेल्या कामगिरीवर अवलंबून असते. केकेआर संघाची फलंदाजीची फळी मजबूत असून, किंग्ज इलेव्हन संघाची गोलंदाजीची बाजू बळकट आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान खेळली जाणारी लढत रंगतदार होण्याची आशा आहे. पुणे संघाविरुद्धच्या लढतीत पंजाब संघाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला होता. मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर पंजाब संघाचा गोलंदाज मोहित शर्माच्या ‘स्लोअर वन’ चेंडूंना कसा सामोरा जातो, याबाबत उत्सुकता आहे. उभय संघ यातून निवडणारकोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), पीयूष चावला, जॉन हेस्टिंग्ज, बॅ्रड हॉग, जेसन होल्डर, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, ख्रिस लिन, मनन शर्मा, मोर्ने मॉर्केल, कॉलिन मन्रो, सुनील नारायण, मनीष पांडे, युसूफ पठाण, अंकित राजपूत, आंद्रे रसेल, राजगोपाल सतीश, शकिबुल हसन, जयदेव उनाडकट, रॉबिन उथप्पा, सूर्यकुमार यादव आणि उमेश यादव.किंग्ज इलेवन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), काईल अ‍ॅबोट, मुरली विजय, मनन व्होरा, मिचेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरितसिंग, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा, प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्क्स स्टोइनिस, स्वप्निल सिंग, अरमान जफर, फरहान बेहरदिन, के.सी. करिअप्पा, ऋषी धवन, गुरकीरतसिंग मान, निखिल नाईक आणि शार्दूल ठाकूर.