शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

किवी अडचणीत

By admin | Updated: October 2, 2016 00:24 IST

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या (५ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची ७ बाद १२८ अशी अवस्था करून दुसऱ्या

कोलकाता : वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या (५ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची ७ बाद १२८ अशी अवस्था करून दुसऱ्या कसोटी सामन्यावरील पकड मजबूत केली. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी बीजे वॉटलिंगला (१२) जीतेन पटेल (०५) साथ देत होता.त्याआधी, कालच्या ७ बाद २३९ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताचा पहिला डाव ३१६ धावांत संपुष्टात आला. रिद्धिमान साहाने (५४) नाबाद अर्धशतकी खेळी केली. न्यूझीलंडला भारताची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप १८८ धावांची गरज असून, त्यांच्या ३ विकेट शिल्लक आहेत. न्यूझीलंडने आज दुसऱ्या दिवशी केवळ ३४ षटके खेळली. पावसाच्या व्यत्ययाने मैदान खेळण्यायोग्य नसल्यामुळे आणि अंधुक प्रकाशामुळे बराच वेळ खेळ शक्य झाला नाही. भारताची पहिल्या दिवसअखेर ७ बाद २३९ अशी नाजूक अवस्था होती; पण आज यजमान संघाने दमदार पुनरागमन केले. तळाच्या फलंदाजांनी उल्लेखनीय योगदान देत भारताला ३००चा पल्ला ओलांडून दिला. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडची चहापानापर्यंत ४ बाद ८५ अशी अवस्था होती. भुवनेश्वरने अचूक मारा करीत ५ बळी घेतले. पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरू झाल्यावर भुवनेश्वरने प्रभारी कर्णधार रॉस टेलर (३६), मिशेल सँटेनर (११) आणि मॅट हेन्री (००) यांना माघारी परतवले. मोहंमद शमीने (१-४६) दुसऱ्या टोकाकडून त्याला योग्य साथ दिली. उपाहारानंतर न्यूझीलंडची ३ बाद २३ अशी अवस्था झाली होती. भुवनेश्वरने निकोल्सला क्लीन बोल्ड केले. टेलर व ल्युक रोंची (३५) यांनी चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जडेजाने रोंचीला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्याआधी रोंची वैयक्तिक १६ धावांवर असताना सुदैवी ठरला. गौतम गंभीर त्याचा झेल टिपण्यात अपयशी ठरला.दरम्यान भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा फ्लूमुळे आजारी आहे. आज (शनिवारी) तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात नव्हता. (वृत्तसंस्था)