शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

किंग्ज इलेव्हनची सरशी

By admin | Updated: April 24, 2017 06:15 IST

हाशिम आमलाच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने इंडियन प्रीमिअर लीगच्या

राजकोट : हाशिम आमलाच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वात रविवारी गुजरात लायन्सचा २६ धावांनी पराभव केला आणि सलग चार पराभवांची मालिका खंडित केली. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८८ धावांची मजल मारली आणि के. सी. करिअप्पा (२-२४), संदीप शर्मा (२-४०) व अक्षर पटेल (२-३६) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर प्रतिस्पर्धी गुजरात संघाचा डाव ७ बाद १६२ धावांत रोखला. गुजरात संघातर्फे दिनेश कार्तिकचे (नाबाद ५८ धावा, ४४ चेंडू, ६ चौकार) प्रयत्न अखेर अपुरेच पडले. पंजाबने सात सामन्यांत तिसरा विजय नोंदवला, तर लायन्स संघाला सात सामन्यांत पाचव्यांदा पराभव स्वीकारावा लागला. लायन्स संघाची गुणातालिकेत तळाच्या स्थानावर घसरण झाली. त्याआधी, हाशिम आमलाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हनने ७ बाद १८८ धावांची दमदार मजल मारली. आमलाने ४० चेंडूंना सामोरे जाताना दोन षटकारांच्या मदतीने ६५ धावा फटकावल्या. आमलाने शॉन मार्शसोबत (३०) दुसऱ्या विकेटसाठी ७० आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेलसोबत (३१) तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने शेवटी १७ चेंडूंमध्ये ३४ धावांची खेळी करीत संघाला आव्हानात्मक मजल मारून दिली. गुजराततर्फे वेगवान गोलंदाज अँड्य्रू टायने दोन, तर शुभम अग्रवाल, नाथू सिंग, रवींद्र जडेजा व ड्वेन स्मिथ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. किंग्ज इलेव्हन पंजाबने दुसऱ्या षटकात मनन व्होराला (०२) गमावले. नाथू सिंगच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने त्याचा झेल टिपला.