शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लायन्सला धक्का देण्यास किंग्ज इलेव्हन पंजाब सज्ज

By admin | Updated: May 7, 2017 00:38 IST

सलग दोन विजयांमुळे आत्मविश्वास बळावलेला किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएल-१० मध्ये रविवारी प्लेआॅफची वाटचाल

मोहाली : सलग दोन विजयांमुळे आत्मविश्वास बळावलेला किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएल-१० मध्ये रविवारी प्लेआॅफची वाटचाल सोपी करण्यासाठी गुजरात लायन्सला धक्का देण्यास सज्ज आहे.दिल्लीचा दहा गड्यांनी पराभव करणाऱ्या पंजाबने काल आरसीबीवरदेखील विजय साजरा केला. पंजाबचे दहा सामन्यांत पाच विजयांसह दहा गुण असून गुजरात लायन्सचे ११ सामन्यांत तीन विजयांसह केवळ सहा गुण आहेत. पंजाबकडून हाशिम आमलाने सर्वाधिक ३१६ धावा केल्या असून त्यात मुंबईविरुद्ध ठोकलेल्या शतकाचा समावेश आहे. मार्टिन गुप्टिल, शॉन मार्श, मनन व्होरा, वृद्धिमान साहा आणि अक्षर पटेल या सर्वांनी संघासाठी योगदान दिले आहे. कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याचा फॉर्म मात्र संघाच्या चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत संदीप शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रभावित केले, पण वरुण अ‍ॅरॉन आणि मोहित शर्मा हे मात्र अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे गुजरात संघ प्लेआॅफमधून बाहेर पडला असून मागच्या दोन्ही सामन्यांत त्यांचा पराभव झाला. दिल्लीविरुद्ध मागच्या सामन्यात ७ बाद २०८ धावा नोंदविल्यानंतरही त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. ब्रँडन मॅक्युलमच्या पायाचे स्नायू ताणले गेल्याने संघाला धक्का लागला आहे. संघाकडून कर्णधार सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांनीच धावांचे बऱ्यापैकी योगदान दिले. इशान किशन, अ‍ॅरॉन फिंच आणि ड्वेन स्मिथ यांच्यासारखे फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले आहेत. संघाला गोलंदाजीत अनुभवहीनतेचादेखील फटका बसला आहे. (वृत्तसंस्था)