शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूपुढे आता किंग्स इलेव्हनचे आव्हान

By admin | Updated: April 10, 2017 01:23 IST

स्टार खेळाडूंविना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध मनोधैर्य उंचावणारा विजय नोंदविल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघापुढे

इंदूर : स्टार खेळाडूंविना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध मनोधैर्य उंचावणारा विजय नोंदविल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघापुढे आज सोमवारी यंदाच्या पर्वातील तिसऱ्या लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबचे आव्हान राहील. आरसीबीने आपल्या मोहिमेची सुरुवात स्टार फलंदाज विराट कोहली व महत्त्वाचा खेळाडू एबी डिव्हिलियर्स यांच्याविना केली होती. आरसीबी संघाला गत चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सलामी लढतीत पराभव स्वीकारावा लागला. भारतीय फलंदाज लोकेश राहुलही दुखापतीमुळे या स्पर्धेतून ‘आऊट’ झाला आहे. प्रतिभावान सर्फराज खानच्या यंदाच्या मोसमातील सहभागाबाबत साशंकता आहे. सराव सत्रादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. कोहली सोमवारच्या लढतीत खेळणार नसल्याचे निश्चित आहे. कारण २ एप्रिलला बीसीसीआयसोबत चर्चा झाल्यानंतर त्याच्या फिटनेसबाबत अद्याप कुठलेही अधिकृत वृत्त आलेले नाही. त्याची फिटनेस चाचणी या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे शनिवारी स्पष्ट करण्यात आले होते. डिव्हिलियर्सच्या खेळण्याबाबतही साशंकता आहे. त्याच्या अनुपस्थितीत वॉटसन प्रभारी कर्णधाराची भूमिका बजावत आहे. मॅक्सवेल सातत्य राखण्यास उत्सुककिंग्स इलेव्हन पंजाब संघाने चांगली सुरुवात करताना रायजिंग पुणे सुपरजायंटचा ६ गडी राखून पराभव केला. आॅस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने चमकदार खेळी करताना २० चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मॅक्सवेलने पुण्याविरुद्धच्या लढतीत संघाचे प्रथमच नेतृत्व केले होते. मॅक्सवेल कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. पंजाब संघ जवळजवळ १० दिवसांपासून होळकर स्टेडियममध्ये सराव करीत आहे. त्यांना तेथील परिस्थितीची चांगली माहिती आहे. संघाचा सिनिअर फलंदाज मुरली विजय दुखापतग्रस्त असल्यामुळे पंजाब संघाला मोठा धक्का बसला आहे.