शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

किंग्स पंजाबचे केकेआरला आव्हान

By admin | Updated: April 13, 2017 04:12 IST

दोन वेळेचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल-१० मध्ये विजयी सातत्य राखणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबचे आज गुरुवारी कडवे आव्हान असेल.

कोलकाता : दोन वेळेचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल-१० मध्ये विजयी सातत्य राखणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबचे आज गुरुवारी कडवे आव्हान असेल. गौतम गंभीरच्या नेतृत्वात २०१२ आणि २०१४ असे दोनदा जेतेपद मिळविणाऱ्या केकेआरचा पंजाबविरुद्ध जय-पराजयाचा रेकॉर्ड १३-६ असा आहे. ख्रिस लीन जखमी झाल्याने परिस्थितीत बदल झालेला जाणवत आहे.आॅस्ट्रेलियाचा फलंदाज लीन याने सलामीच्या लढतीत गुजरातविरुद्ध नाबाद ९३ धावा केल्या; शिवाय गौतम गंभीरसोबत १९३ धावांची भागीदारी करताच केकेआरने १० गड्यांनी सामना जिंकला होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध लीनला डाव्या खांद्याला दुखापत झाली. केकेआरला हा सामना ४ गड्यांनी गमवावा लागला. त्याआधी २०१४मध्ये लीनने याच दुखण्यावर श्स्त्रक्रिया करून घेतली होती. त्याचे उद्या खेळणे निश्चित नाही. वेगवान गोलंदाज उमेश यादव संघात परतला, ही केकेआरसाठी दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. पहिल्या दोन्ही सामन्यांत उमेश खेळला नाही. यंदा १३ पैकी १२ कसोटी सामने खेळणाऱ्या उमेशने बऱ्यापैकी गडी बाद केले आहेत. मुंबईविरुद्ध महागडा ठरलेल्या अंकित राजपूतचे उमेश स्थान घेईल. याशिवाय बांगलादेशाचा शाकीब अल् हसन हा ट्रेंट बोल्ट किंवा ख्रिस व्होग्स यांच्यापैकी एकाची जागा घेऊ शकतो. रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे यांच्याकडून गंभीरला धावांची अपेक्षा आहे. २०१४च्या पर्वात अंतिम फेरी गाठणाऱ्या पंजाबने यंदा वीरेंद्र सेहवागच्या मार्गदर्शनात वाटचाल सुरू केली. पुणे आणि बँगलोर संघांवर विजय मिळविताना संघव्यवस्थापनाने अनेक साहसी निर्णय घेतले. इयोग मोर्गन आणि डेरेन सॅमी यांना मागे ठेवून ग्लेन मॅक्सवेलकडे नेतृत्व सोपविण्याचा सर्वांत मोठा निर्णय होता. मॅक्सवेलने पहिल्या सामन्यात नाबाद ४४ आणि पुढच्या सामन्यात २२ चेंडूंत नाबाद ४३ धावा ठोकल्या. याशिवाय सेहवागने आधी केकेआरकडे असलेल्या ईशांत शर्माला अखेरच्या क्षणी संघात आणले.