शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

किदाम्बी श्रीकांतची ऑस्ट्रेलियन सुपर सिरिजच्या फायनलमध्ये धडक

By admin | Updated: June 24, 2017 14:06 IST

भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपूट किदाम्बी श्रीकांत सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून तो ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरिजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

सिडनी , दि. 24 - भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपूट किदाम्बी श्रीकांत सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून तो ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरिजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्यफेरीतील महत्वाच्या सामन्यात श्रीकांतने चौथ्या सीडेड चीनच्या  युकी शी वर  21-10, 21-14 असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणा-या युकी शी सारख्या अव्वल खेळाडूला हरवल्यामुळे श्रीकांतचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असणार. 
 
श्रीकांतने  सलग तिसऱ्या सुपर सिरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यापूर्वी त्याने सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. मागच्या आठवडयात त्याने इंडोनेशियन ओपनचे जेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आहे. श्रीकांतने सिंगापूर ओपनमध्ये युकीवर विजय मिळवला होता. जोरदार स्मॅश आणि बॅकहॅण्डच्या फटक्याचा अप्रतिम वापर करत श्रीकांतने अवघ्या 40 मिनिटात चीनी प्रतिस्पर्ध्याला लोळवले. 
 
आणखी वाचा 
 
पहिल्या गेमला सुरुवात झाल्यानंतर श्रीकांत आणि युकी दोघे 5-5 असे बरोबरीत होते. पण त्यानंतर श्रीकांतने आपल्या खेळाचा स्तर असा काही  उंचावला की, युकीला त्याने पुनरागमनाची संधीच दिली नाही. अवघ्या 15 मिनिटात त्याने पहिला गेम 21-10 असा जिंकला. दुस-या गेमममध्येही दोघे 6-6 असे बरोबरीत होते. पण त्यानंतर श्रीकांतने 11-8 अशी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत आघाडी टिकवून गेमसह सामना जिंकला. 
 
माझी कामगिरी स्वप्नत अशीच होती अशी प्रतिक्रिया श्रीकांतने सामन्यानंतर दिली. दोनवर्षांनंतर मी सिंगापूर ओपनच्या निमित्ताने वर्ल्ड सुपर सिरिजची फायनल खेळलो. त्यानंतर सलग दोन फायनलमध्ये खेळतोय नक्कीच माझ्यासाठी हे स्वप्नवत आहे असे श्रीकांतने सांगितले. युकी विरुद्ध खेळताना माझे संपूर्ण सामन्यावर नियंत्रण होते. मी त्याला सहज पाँईटस मिळू दिले नाही असे श्रीकांतने सांगितले. महिला गटात भारताच्या पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल या दोन्ही प्रमुख खेळाडूंना स्पर्धेबाहेर पडावे लागले. यासह महिला एकेरी गटातील भारताचे आव्हान संपुष्टात आले.