शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केन विलियम्सन तिन्ही प्रकारांत अव्वल पाचमध्ये

By admin | Updated: January 10, 2017 01:46 IST

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सोमवारी जाहीर झालेल्या टी-२० मानांकनामध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. विलियम्सन

दुबई : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सोमवारी जाहीर झालेल्या टी-२० मानांकनामध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. विलियम्सन भारतीय कर्णधार विराट कोहलीनंतर आयसीसी मानांकनात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल पाचमध्ये स्थान मिळविणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर विलियम्सनने अव्वल पाचमध्ये स्थान मिळविले. न्यूझीलंडने टी-२० मालिकेत बांगलादेशचा ३-० ने सफाया केला. विलियम्सनने नाबाद ७३, १२ व ६० धावांची खेळी केली. मालिकेत त्याने एकूण १४५ धावा फटकाविल्या. या चमकदार कामगिरीचा त्याला मानांकनामध्ये लाभ झाला. त्याने दोन स्थानांनी प्रगती करताना चौथे स्थान पटकाविले. विलियम्सनने कसोटी व वन-डे मानांकनामध्ये यापूर्वीच अव्वल पाचमध्ये स्थान मिळविले आहे. तो कसोटीमध्ये चौथ्या, तर वन-डेमध्ये पाचव्या स्थानी आहे. विलियम्सन व्यतिरिक्त कोलिन मुन्रोने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रगती केली आहे. त्याने दुसऱ्या लढतीत ५४ चेंडूंना सामोरे जाताना १०१ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने १९ वे स्थान पटकाविले. टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत आयसीसी एमर्जिंग ‘क्रिकेटर आॅफ द इयर’ पुरस्काराचा मानकरी बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमानने १० स्थानांची प्रगती केली असून, तो १०व्या स्थानी दाखल झाला आहे. तो बांगलादेशचा सर्वोत्तम मानांकन असलेला खेळाडू ठरला आहे.त्याने शाकिब अल-हसनला पिछाडीवर सोडले आहे. शाकिबने तीन स्थानांची प्रगती केली असून तो ११ व्या स्थानी आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. बांगलादेशविरुद्ध ३-० ने विजय मिळवल्यामुळे त्यांना एका मानांकन गुणांचा लाभ झाला आहे. त्यांच्या खात्यावर १२९ मानांकन गुणांची नोंद आहे. भारत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशला एका मानांकन गुणाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या खात्यावर ७२ मानांकन गुणांची नोंद आहे. (वृत्तसंस्था)  यापूर्वी, जागतिक क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल पाचमध्ये समावेश असलेला कोहली एकमेव फलंदाज होता. कोहली टी-२० मध्ये अव्वल स्थानी असून, वन-डे व कसोटीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.   विशेष बाब म्हणजे, कोहली व विलियम्सन या दोघांनी मलेशियात २००८ मध्ये आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वकप स्पर्धेत आपापल्या संघाचे नेतृत्व केले होते. भारताने दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १२ धावांनी पराभव करीत जेतेपद पटकाविले होते.