शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

केदार जाधवच्या शतकी खेळीने भारत अजिंक्य

By admin | Updated: July 16, 2015 08:46 IST

केदार जाधवचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक तसेच मनीष पांडेच्या पदार्पणातील ७१ धावांच्या बळावर भारताने मंगळवारी झिम्बाब्वेचा तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेमध्ये

हरारे : केदार जाधवचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक तसेच मनीष पांडेच्या पदार्पणातील ७१ धावांच्या बळावर भारताने मंगळवारी झिम्बाब्वेचा तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेमध्ये ८३ धावांनी पराभव करीत मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केले.भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात २७६ धावा नोंदविल्यानंतर झिम्बाब्वेला ४२.४ षटकांत १९३ धावांत रोखले व सामना सहज जिंकला. पराभूत संघाकडून चामू चिभाभा याने सर्वाधिक ८२ धावांचा एकाकी संघर्ष केला; पण दुसऱ्या टोकाहून त्याला साथ मिळू शकली नाही. या मालिकेत सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या चिभाभाने १०९ चेंडूंचा सामना करीत सात चौकार मारले. झिम्बाब्वेची गळती सहाव्या षटकापासूनच सुरू झाली. हॅमिल्टन मस्कद्जा ७ हा मोहीतच्या चेंडूवर पायचित झाल्यानंतर चिभाभा-चकाब्वा (२७) यांनी ७० धावांची भागीदारी केली. कर्णधार एल्टन चिगुंबुरा याला मुरली विजयने बाद केले. यष्टिरक्षक रिचमंड मुतुबामी (२२) बाद होताच झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा मावळल्या. बिन्नीने ५५ धावा देत तीन आणि मोहीत शर्मा, अक्षर पटेल व हरभजनसिंग यांनी दोन गडी बाद केले.तत्पूर्वी नाणेफेक जिंकून झिम्बाब्वे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. केदार जाधवच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट (१०५ धावा) खेळीच्या बळावर भारताने आघाडीच्या फळीच्या अपयशानंतरही पाच गड्यांच्या मोबदल्यात २७६ धावा उभारल्या. जाधवने मनीष पांडेसोबत (७१) पाचव्या गड्यासाठी १४४ धावांची भागीदारी केली. भारताची एक वेळ चार बाद ८२ अशी घसरगुंडी झाली होती; पण दोघांनी धावसंख्येला आकार दिला. स्टुअर्ट बिन्नी (१८) याने जाधवसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पांडेने ८६ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ७१ धावा केल्या, तर जाधवने ८७ चेंडूंत १२ चौकार व एका षटकारासह १०५ धावा ठोकल्या. रॉबिन उथप्पानेदेखील ३१ धावांचे योगदान दिले. सुरुवात मात्र खराब झाली. अजिंक्य रहाणे १५, मुरली विजय १३ हे झटपट बाद झाले. नेव्हिले मेदजिवा याने दोघांना बाद केले. चामू चिभाभा, हॅमिल्टन मस्कद्जा व प्रॉस्पर उत्सेया यांनी एकेक गडी बाद केला.(वृत्तसंस्था)पांडे २०६ वा खेळाडू!मनीष पांडे हा वन डे पदार्पण करणारा भारताचा २०६ वा खेळाडू ठरला. २५ वर्षांचा मनीष कृष्णानंद पांडे याचा जन्म उत्तराखंडमधील नैनितालचा. कर्नाटककडून तो रणजी सामने खेळतो. झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्याने पदार्पण करीत ७१ धावा ठोकल्या. १९ वर्षांच्या वयात त्याने आयपीएलचा पहिला भारतीय शतकवीर होण्याचा मान मिळविला होता. धावफलकभारत : अजिंक्य रहाणे झे. उत्सेया गो. मेदजिवा १५, मुरली विजय झे. मुतुंबामी गो, मेदजिवा १३, रॉबिन उथप्पा झे. चिगुंबुरा गो. मस्कद्जा ३१, मनोज तिवारी झे. आणि गो. उत्सेया १०, मनीष पांडे झे. रझा गो. चिभाभा ७१, केदार जाधव नाबाद १०५, स्टुअर्ट बिन्नी नाबाद १८, अवांतर : १३, एकूण : ५० षटकांत ५ बाद २७६ धावा. गोलंदाजी : त्रिपानो ८-०-४६-०, मेदजिवा ९-०-५९-२, चिभाभा ८-०-५५-१, मस्कद्जा १०-०-३१-१, उत्सेया १०-०-४१-१, क्रेमर ५-०-४२-०.झिम्बाब्वे : मस्कद्जा पायचित गो. शर्मा ७, चिभाभा झे. जाधव गो. बिन्नी ८२, आर. चकाब्वा त्रि. गो. पटेल २७, चिगुंबुरा पायचित गो. विजय १०, मुतुबामी पायचित गो. बिन्नी २२, सिकंदर रझा त्रि. गो. हरभजन १३, एम. वालेर झे. रहाणे गो. बिन्नी ५, क्रेमर झे. रहाणे गो. हरभजन ००, उत्सेया झे. उथप्पा गो. शर्मा ००, त्रिपानो नाबाद १३, मेदजिवा यष्टिचित गो. पटेल ३, अवांतर : ११, एकूण :४२.४ षटकांत सर्वबाद १९३ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर ६-१-१२-०, मोहित शर्मा ७-०-३३-२, बिन्नी १०-१-५५-३, हरभजन १०-०-३५-२, पटेल ६.४-०-३९-२, विजय ३-०-१९-१.