के.सी. बजाज महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 23:32 IST
सीपीएस, भवन्स, नारायणा विद्यालय अंतिम फेरीतके.सी. बजाज स्मृती क्रीडा महोत्सवनागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित के.सी. बजाज आंतरशालेय क्रीडा महोत्सवात बास्केटबॉल उपांत्य लढतीत मुलींमध्ये सेंटर पॉईंट स्कूल, भवन्स स्कूल आणि मुलांमध्ये सेंटर पॉईंट स्कूल व नारायणा विद्यालयाने विजय नोंदवित अंतिम फेरी गाठली.जरीपटका येथील महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलच्या मैदानावर ...
के.सी. बजाज महोत्सव
सीपीएस, भवन्स, नारायणा विद्यालय अंतिम फेरीतके.सी. बजाज स्मृती क्रीडा महोत्सवनागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित के.सी. बजाज आंतरशालेय क्रीडा महोत्सवात बास्केटबॉल उपांत्य लढतीत मुलींमध्ये सेंटर पॉईंट स्कूल, भवन्स स्कूल आणि मुलांमध्ये सेंटर पॉईंट स्कूल व नारायणा विद्यालयाने विजय नोंदवित अंतिम फेरी गाठली.जरीपटका येथील महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या उपांत्य सामन्यात सेंटर पॉईंट स्कूलने सरस्वती विद्यालयाला १९-२ ने पराभूत केले. दुसऱ्या उपांत्य लढतीत भवन्स स्कूलने सेंटर पॉईंट स्कूलला २२-४ ने नमविले.मुलांच्या उपांत्य सामन्यात सेंटर पॉईंट स्कूलने वर्धमाननगर येथील सेंटर पॉईंट स्कूलला ३१-१२ आणि नारायणा विद्यालयाने सरस्वती विद्यालयाला २१-१३ असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली. (क्रीडा प्रतिनिधी)