शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कौन बनेगा ‘नंबर वन’?, आश्विन, जडेजामध्ये होणार झुंज

By admin | Updated: February 8, 2017 00:42 IST

आगामी ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांगलादेश एकमेकांविरुद्ध लढण्यास सज्ज झाले

दुबई : आगामी ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांगलादेश एकमेकांविरुद्ध लढण्यास सज्ज झाले असतानाच, दुसरीकडे मात्र भारतीय संघातील दोन प्रमुख फिरकी गोलंदाज ‘नंबर वन’ ठरण्यासाठी एकमेकांविरुद्ध झुंजतील. सध्या आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दोन स्थानी असलेल्या रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये या सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल.आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सध्या आश्विन अव्वल स्थानी विराजमान असून, त्याखालोखाल जडेजा द्वितीय क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आश्विन आणि जडेजा यांच्यामध्ये केवळ ८ गुणांचे अंतर असल्याने जडेजाला अव्वल स्थान काबीज करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे, बांगलादेशाविरुद्ध दबदबा राखून आपले अव्वल स्थान आणखी भक्कम करण्यास आश्विन उत्सुक असेल. यामुळेच या दोन स्टार गोलंदाजांच्या लढाईमध्ये कोण कोणाची ‘फिरकी’ घेणार, याबाबत क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात इंदूरमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध ३२१ धावांनी विजय मिळविल्यापासून आश्विन मानांकनामध्ये अव्वल स्थानावर आहे. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धही चमकदार कामगिरी करताना आपले अव्वल स्थान कायम राखले. मात्र, याच दौऱ्यात जडेजाने सातत्यपूर्ण कामगिरी करून क्रमवारीमध्ये मोठी झेप घेऊन द्वितीय स्थान पटकावले. यामुळे एक वेळ कोणाचीही स्पर्धा नसलेल्या आश्विनपुढे आपल्याच संघातील जडेजाचे नवे आव्हान उभे राहिले. सर्व काही एका गुणासाठीसंघांच्या क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानावर असून, बांगलादेश नवव्या स्थानी आहे. जर या सामन्यात बांगलादेशाने विजय मिळविला, तर त्यांना ५ मानांकन गुणांचा लाभ होईल. भारताला दोन मानांकन गुणांचे नुकसान सहन करावे लागेल. त्याच वेळी भारताने विजय मिळविल्यास यजमानांना एका मानांकन गुणाचा लाभ होईल, तर बांगलादेशाचा एक मानांकन गुण कमी होईल.भारत-बांगलादेश कसोटी सामन्यात सहभागी होणाऱ्या पाहुण्या संघाचा शाकीब अल्-हसन हा तिसरा सर्वोत्तम मानांकन असलेला गोलंदाज आहे. आयसीसी क्रमवारीत तो १४व्या स्थानी आहे. त्याचप्रमाणे, भारताचा ईशांत शर्मा (२३), बांगलादेशाचा मेहदी हसन (३६), भारताचा उमेश यादव (३७) आणि बांगलादेशाचा ताजुल इस्लाम (३९) यांनाही आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी आहे. ‘विराट’ सुधारणा करायची आहेफलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर असलेल्या आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या तुलनेत ५८ मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. या एकमेव सामन्यातून हे अंतर कमी करण्याची कोहलीला संधी असेल. त्याचप्रमाणे, चेतेश्वर पुजारा (१२), अजिंक्य रहाणे (१५), शाकीब (२२), मुरली विजय (२७), तमीम इक्बाल (२८) आणि मोमीनुल हक (२९) यांनाही आपल्या मानांकनातील स्थान सुधारण्याची संधी आहे.