शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कश्यप-प्रणय जेतेपदासाठी झुंजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 01:10 IST

बॅडमिंटनमध्ये पुरुष विभागात भारतीय खेळाडू कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपने

अनाहीम (कॅलिफोर्निया) : बॅडमिंटनमध्ये पुरुष विभागात भारतीय खेळाडू कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपने अमेरिकन ओपन ग्राप्री गोल्ड फायनलमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. आता जेतेपदासाठी कश्यपला अंतिम फेरीत मायदेशातील सहकारी एच.एस प्रणयसोबत लढत द्यावी लागेल. आॅक्टोबर २०१५ मध्ये पोटरीच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेणाऱ्या कश्यपने तेव्हापासून आतापर्यंत २१ महिन्यांच्या कालावधीत प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. दुखापतीमुळे संघर्ष करीत असलेल्या प्रणयने गेल्या वर्षी स्विस ओपनमध्ये जेतेपद पटकावल्यानंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. कश्यपने एक तास व सहा मिनिट रंगलेल्या उपांत्य लढतीत कोरियाच्या क्वांग ही हीयोची झुंज १५-२१, २१-१५, २१-१६ ने मोडून काढली. दुसऱ्या उपांत्य लढतीत प्रणयने व्हिएतनामच्या टी.एन. मिन्ह एनगुएनचा २१-१४, २१-१९ ने सहज पराभव केला. यंदाच्या मोसमात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूंदरम्यान अंतिम लढत रंगणार आहे. एप्रिल महिन्यात श्रीकांत व बी. साई प्रणित यांनी सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यात प्रणितने प्रथमच सुपर सिरीजचे जेतेपद पटकावले होते. मनू अत्री व बी. सुमित रेड्डी या जोडीला कडव्या संघर्षानंतर ल्यू चिंग याओ व यांग पो हान या अव्वल मानांकित जोडीविरुद्ध १२-२१, २१-१२, २०-२२ ने पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या मोसमातील भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंसाठी ग्रांप्री गोल्डचे हे तिसरे विजेतेपद ठरेल. यापूर्वी समीरने सैयद मोदी ग्रांप्री तर प्रणितने थायलंड ओपनचे जेतेपद पटकावले होते. भारतीय खेळाडूंनी यंदाच्या मोसमात तीन सुपर सिरिज स्पर्धांमध्ये जेतेपदाला गवसणी घातली आहे. श्रीकांतने इंडोनेशिया व आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये जेतेपद पटकावले तर प्रणित सिंगापूर ओपनमध्ये अजिंक्य ठरला. (वृत्तसंस्था)अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे आनंदविजयानंतर प्रतिक्रिया देताना कश्यप म्हणाला, ‘प्रदीर्घ कालावधीनंतर अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे आनंद झाला. कोरियन खेळाडूविरुद्धची लढत खडतर होती. त्याने चांगली सुरुवात केली आणि मला परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेळ लागला. तो आक्रमक स्मॅश लगावत होता. मलाही सूर गवसला आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.’