शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

करुण नायरच्या पदार्पणाची शक्यता!

By admin | Updated: November 17, 2016 02:03 IST

राजकोटच्या पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडने भारताला चांगलाच धडा शिकविला. कर्णधार कूकच्या साहसी निर्णयाचा देखील परिचय झाला

सुनील गावसकर लिहितो-राजकोटच्या पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडने भारताला चांगलाच धडा शिकविला. कर्णधार कूकच्या साहसी निर्णयाचा देखील परिचय झाला. त्याने संघाला सावरल्यानंतर भारताला विजयासाठी २४० धावांचे आव्हान देऊ शकला असता पण असे केल्यामुळे टीकाकारांना उत्तर देणे त्याच्यासाठी जड गेले असते. इंग्लंडच्या फलंदाजांनी दोन्ही डावांत संयम आणि आक्रमकतेचा परिचय देत भारतीय फिरकीपटूंना हतबल केले. तुम्ही समजता तसेच आम्ही नांगी टाकणारे नाही, असा स्पष्ट संदेश यातून बाहेर आला आहे. राजकोटची खेळपट्टी देखील फिरकीला मुळीच उपयुक्त वाटली नाही. ती फलंदाजांना पूरक होती. दुसऱ्या डावात काही चेंडू वळण घेऊ लागले तेव्हा देखील पाहुण्या फलंदाजांनी धैर्याने तोंड देत संकटाचा सामना केला. विकेट मिळतील अशा लाईन आणि लेंग्थने चेंडू टाकणे भारतीय फिरकीपटूंना राजकोटमध्ये जमलेच नाही. चौथ्या आणि पाचव्या दिवशी जडेजाला थोडीफार साथ लाभली, पण तो बळी घेण्यासाठी नव्हे तर षटकार लागणार नाहीत याची काळजी घेत गोलंदाजी करीत असल्याचे जाणवले. पण त्याने गुड लेंग्थवर आखूड टप्याचे चेंडू टाकायला हवे होते. अशावेळी फलंदाज खेळण्यासाठी बाहेर येतो. चेंडू टोलविण्यात तो अपयशी ठरला तर बाद होऊ शकतो. या मालिकेआधी इंग्लंडचे फलंदाज बांगला देशात खेळले नसते तर कदाचित अडचणीत येऊ शकले असते. या दौऱ्यात त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. त्यामुळेच ते पुढे येऊनही खेळतात. क्रिझ न सोडता देखील चेंडू टोलविण्याची कला देखील आत्मसात केलेली दिसते. भारतीय फलंदाजांनी देखील राजकोटमध्ये खेळपट्टीचा लाभ घेत इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग केला. पण दुसऱ्या डावात इंग्लिश फिरकीपुढे त्यांची तारांबळ उडालीच! आता दुसऱ्या सामन्यात भारताची चिंता वाढली आहे. नाणेफेकीचा काल विरोधात गेला आणि सुरुवातीला फलंदाजीची संधी मिळाली नाही तर चौथ्या डावात पाठलाग करताना संकट ओढविण्याचा धोका आहे. त्यादृष्टीने अंतिम एकादशची निवड करावी लागेल. करुण नायर हा सहावा फलंदाज या नात्याने पदार्पण करु शकतो. याच खेळपट्टीवर काही दिवसांआधी वन डेत पाच गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला बाहेर ठेवणे हा त्याच्यावर अन्याय होईल. लेगस्पिनरला आत्मीयतेने हाताळायला हवे, असे शेन वॉर्न नेहमी म्हणायचा. पण काही आधुनिक कर्णधार लेगस्पिनरबाबत जुगार खेळतात. लेगस्पिनर धावांबाबत खर्चिक ठरतात असे यामागे कारण देतात. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या तीनपैकी दोन फलंदाजांना मिश्रानेच बाद केले. मला गोलंदाजीची पुरेपूर संधी दिल्यास फलंदाजांना अडचणीत आणू शकतो, असे त्याने संकेत दिले आहेत. इंग्लंड संघात वेगवान अ‍ॅण्डरसन पुनरागमन करू शकतो. विश्व क्रिकेटमध्ये चेंडू दोन्ही बाजूने वळविणारा तो एकमेव गोलंदाज आहे. तो खेळल्यास भारतीय फलंदाजांची विशेषत: सलामी जोडीची कसोटी असेल. राजकोटमध्ये उभय संघांनी परस्परांना ओळखले त्यामुळे खरी परीक्षा सुरू होईल ती आजपासूनच!