क्रिकेट स्पर्धेसाठी कपिलदेव, अमिषा पटेल येणार शारदा खडसे-चौधरी: स्व. निखील खडसे स्मृती डे-नाईट स्पर्धा; विजेत्या संघास दोन लाख
By admin | Updated: April 26, 2016 23:22 IST
जळगाव : स्व. निखील खडसे स्मृतीप्रित्यर्थ दुसर्या राज्यस्तरीय डे-नाईट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी १ मे रोजी माजी कर्णधार कपिलदेव व अभिनेत्री अमिषा पटेल उपस्थित राहणार आहेत. १ ते ८ मे दरम्यान होणार्या या स्पर्धेसाठी १६ संघांचा सहभाग असेल अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शारदा खडसे-चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
क्रिकेट स्पर्धेसाठी कपिलदेव, अमिषा पटेल येणार शारदा खडसे-चौधरी: स्व. निखील खडसे स्मृती डे-नाईट स्पर्धा; विजेत्या संघास दोन लाख
जळगाव : स्व. निखील खडसे स्मृतीप्रित्यर्थ दुसर्या राज्यस्तरीय डे-नाईट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी १ मे रोजी माजी कर्णधार कपिलदेव व अभिनेत्री अमिषा पटेल उपस्थित राहणार आहेत. १ ते ८ मे दरम्यान होणार्या या स्पर्धेसाठी १६ संघांचा सहभाग असेल अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शारदा खडसे-चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात होणार्या या स्पर्धेविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, महसूल, कृषी तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या सूचनेनुसार यावर्षी विजेत्या संघास बक्षिसाची रकम वाढून देण्यात आली आहे. या संघास २ लाख, ट्रॉफी, उपविजेत्या संघाला दीड लाख, ट्रॉफी, तसेच स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्या खेळाडूंना विशेषत: मालिकावीरास दुचाकी वाहन, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना एलसीडी टी.व्ही., प्रत्येक सामनावीराला मोबाईल हॅण्डसेट तसेच स्पर्धेतील प्रत्येक षट्कारास रोख एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी स्पर्धा असल्याचेही त्यांनी नमूद केले. कपिलदेव, अमिषा पटेल येणारस्पर्धेचे उद्घाटन १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या हस्ते होईल. बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल यांची यावेळी उपस्थिती असेल.१६ संघांचा सहभाग२०-२० षटकांची बाद पद्धतीने होणार्या या स्पर्धेमध्ये १६ संघांचा सहभाग असेल. यातील आठ संघ हे जळगावचे असतील. तर उर्वरित बाहेरचे असतील. यात मुंबई, बडोदा, नाशिक, औरंगाबाद, बीड,अहमदनगर, अकोला, नागपूर येथील संघ राहू शकतात. जिल्ाबाहेरील आठ संघांनाच प्रवेश असणार असल्याने तसेच या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या संघांची संख्या जास्त असल्याने निवडक संघांना प्रवेश देण्यात आला असल्याचेही शारदा चौधरी म्हणाल्या. दोन दोन सामनेस्पर्धेत दररोज दोन सामने होतील. स्पर्धेतील खेळाडूंना विशेष ड्रेस व पांढरा लेदर बॉल, आयपीएल सामन्यांप्रमाणे एलईडी स्टम्प्स् वापरण्यात येणार आहेत. तसेच एलईडी स्क्रीन मैदानावर असतील. १३ हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.