शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कर्बरचा ऐतिहासिक पराभव

By admin | Updated: May 29, 2017 00:47 IST

जर्मनीची एंजेलिक कर्बर रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभव स्वीकारणारी पहिली अव्वल मानांकित महिला खेळाडू ठरली

पॅरिस : जर्मनीची एंजेलिक कर्बर रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभव स्वीकारणारी पहिली अव्वल मानांकित महिला खेळाडू ठरली आहे तर चाकूहल्ल्यातून बचावल्यानंतर पुनरागमन करताना पेत्रा क्विटोव्हाने शानदार सलामी दिली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कर्बरला रशियाच्या इकटेरिना मकारोव्हाविरुद्ध ६-२, ६-२ ने पराभव स्वीकारावा लागला. ओपन युगात प्रथमच अव्वल मानांकित महिला खेळाडूला रोला गॅरोवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फ्रेंच ओपनमध्ये झटपट गाशा गुंडाळणाऱ्या अव्वल मानांकित खेळाडूंमध्ये जस्टिन हेनिन (२००४) व सेरेना विलियम्स (२०१४) यांचा समावेश आहे. कर्बरने गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपन व यूएस ओपनमध्ये जेतेपद पटकावले होते तर विम्बल्डनमध्ये ती उपविजेती होती, पण रोला गॅरोच्या लाल मातीवर मकारोव्हाविरुद्ध मात्र तिला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कर्बरने पहिल्या सेटमध्ये केवळ चार विनर लगावले आणि १२ टाळण्याजोग्या चुका केल्या. दुसऱ्या सेटमध्ये मकारोव्हाने सुरुवातीलाच ३-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर कर्बरने काही चांगले फटके मारत सूर गवसल्याचे संकेत दिले. त्यानंतर मकारोव्हा सामना जिंकण्यासाठी सर्व्हिस करीत असताना कर्बरला सातवेळा ब्रेक पॉर्इंटची संधी मिळाली, पण त्यावर तिला गुण नोंदविता आला नाही. महिला विभागात सेरेना विलियम्सन, मारिया शारापोव्हा आणि व्हिक्टोरिया अजारेंका यांच्यासारख्या अव्वल खेळाडू सहभागी न झाल्यामुुळे आणि कर्बर पहिल्याच फेरीत गारद झाल्यामुळे अन्य खेळाडूंना जेतेपद पटकावण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या खेळाडूंमध्ये दोनदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या क्वितोव्हाचाही समावेश आहे. क्वितोव्हाने अमेरिकेच्या ज्युलिया बोसरपचा ६-३, ६-२ ने पराभव केला. क्वितोव्हावर डिसेंबर महिन्यात चेक प्रजासत्ताकमधील तिच्या निवासस्थानी एका दरोडेखोराने चाकूने हल्ला केला होता. त्यावेळी तिला गंभीर दुखापत झाली होती. आज पहिल्या फेरीत विजय मिळवल्यानंतर २७ वर्षीय क्वितोव्हाच्या डोळ्यात अश्रू तराळले. क्वितोव्हा हल्ल्यामध्ये हाताला झालेल्या दुखापतीबाबत बोलताना म्हणाली,‘मी आज विजय मिळविला असला तरी मला माहिती आहे की मी यापूर्वीच जिंकलेली आहे.’ आॅलिम्पिक चॅम्पियन मोनिका पुइग दुहेरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. प्युतेरिकाच्या या खेळाडूने ३१ व्या मानांकित इटलीच्या रॉबर्टा विन्सीची झुंज ६-३, ३-६, ६-२ ने मोडून काढली. ३० व्या मानांकित स्वित्झर्लंडच्या टिमिया बासिनस्कीने स्पेनच्या सारा सोरिबेसचा ६-१, ६-२ ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. अमेरिकेच्या मेडिसन बें्रगलने जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जचा तीन तास रंगलेल्या लढतीत १-६, ६-३, १३-११ ने पराभव केला. पुरुष विभागात १९ व्या मानांकित स्पेनच्या अल्बर्ट रामोसने रोमानियाच्या मारियस कोपिलचा ६-७, ६-१, ६-४, ६-२ ने पराभव केला. लक्समबर्गच्या २६ व्या मानांकित जाइल्स मुलर व अर्जेंटिनाचा बिगरमानांकित होरासियो जेबालोस हे खेळाडूही दुसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरले. (वृत्तसंस्था)