कबड्डी
By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST
ग्रामीण पोलीस, विदर्भ क्लबची आगेकूच
कबड्डी
ग्रामीण पोलीस, विदर्भ क्लबची आगेकूचमहापौर चषक अ.भा. कबड्डी स्पर्धानागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे चिटणीस पार्कवर खेळल्या जात असलेल्या महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात नागपूर ग्रामीण पोलीस आणि महिला विभागात विदर्भ क्लब संघांनी आगेकूच केली. पुरुष विभागात ग्रामीण पोलीस संघाने सुपर सेव्हन नवी दिल्ली संघाची झुंज २९-२४ ने मोडून काढली. मध्यंतरापर्यंत उभय संघांदरम्यान तुल्यबळ लढत झाली. मध्यंतराला खेळ थांबला त्यावेळी उभय संघांदरम्यान १०-१० अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात ग्रामीण पोलीस संघाने वर्चस्व गाजवत १९ गुण वसूल केले. दुसऱ्या बाजूचा विचार करता नवी दिल्ली संघाला केवळ १४ गुणांची कमाई करता आली. अन्य सामन्यात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा संघाला समर्थ क्रीडा मंडळाविरुद्ध १७-३८ ने पराभव स्वीकारावा लागला.महिला विभागात विदर्भ क्लबने महर्षी दयानंद क्लब रोहतक संघाचा ३२-१८ ने सहज पराभव केला. मध्यंतरापर्यंत नागपूर संघाने १९-७ अशी भक्कम आघाडी मिळविली होती. नागपूर शहर पोलीस संघाने रचना क्लब नासिक संघाविरुद्ध ३०-२८ ने सरशी साधली. (क्रीडा प्रतिनिधी)निकाल (पुरुष)ग्रामीण पोलीस मात सुपर सेव्हन २९-२४, वंदे मातरम (जयपूर) मात साई (मुंबई) ४५-१६, नवी मुंबई मात उत्तर प्रदेश पोलीस (गाझियाबाद) १७-१०, आयटीबीटी (नवी दिल्ली) मात पिंपरी चिंडवड ४१-१६, सिंग ब्रिगेड मात लकी वंडर्स (इंदूर) ३७-२४, बाबा हरदास (हरियाणा) मात सप्तरंग क्लब ३५-८, कॅड (पुलगाव) मात जिल्हा परिषद (गोंदिया) ३३-१३, समर्थ क्रीडा मंडळ मात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा ३८-१७, नवी मुंबई मात पिंपरी चिंडवड २४-२०, युवा स्पोर्ट्स (सोनिपत) मात न्यू ताज (नगापूर) २२-१३, ऑर्डिनन्स फॅक्टरी मात श्रीकृष्ण क्रीडा मंडळ (हैदराबाद )३०-२६. महिला :- शिवशक्ती क्रीडा मंडळ (मुंबई) मात सिंग ब्रिगेड (दिल्ली) १४-१२, सुभाष क्लब मात राणा स्पोर्ट्स (पंजाब) २८-१०, हरियाणा मात ब्रम्हप्रकाश (सोनीपत) ३३-८, विदर्भ क्लब (नागपूर) मात महर्षी दयानंद (रोहतक) ३२-१८, हरियाणा मात महर्षी दयानंद आर्य ५९-१२, छत्तीसगड पोलीस मात शिवशक्ती क्रीडा मंडळ (मुंबई) ४५-३६, एचएस स्पोर्ट्स (छत्तीसगड) मात छत्रपती क्रीडा मंडळ १८-९, राजमाता जिजाऊ (पुणे) मात सुभाष क्लब २६-१३, शहर पोलीस (नागपूर) मात रचना क्लब (नासिक) ३०-२८), ब्रम्हप्रकाश (सोनीपत) मात सुपर सेव्हन २९-२२.