शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
4
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
5
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
6
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
7
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
8
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
9
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
10
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
11
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
12
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
13
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
14
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
15
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
16
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
17
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
18
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
19
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
20
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...

हरजितकडे ज्युनिअर हॉकी संघाची धुरा

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

नेदरलँड येथे १८ ते २५ जुलैदरम्यान होणाऱ्या २१ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी भारताने १८ खेळाडूंच्या पुरुष संघाची घोषणा केली असून,

नवी दिल्ली : नेदरलँड येथे १८ ते २५ जुलैदरम्यान होणाऱ्या २१ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी भारताने १८ खेळाडूंच्या पुरुष संघाची घोषणा केली असून, संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिडफिल्डर हरजितसिंग याच्याकडे सोपविण्यात आली आहे. एकूण ६ देशांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत भारतासह यजमान नेदरलँड, जर्मनी, इंग्लंड, बेल्जियम आणि न्यूझीलंड या देशांमध्ये विजेतेपदाची चुरस रंगेल. गेल्या महिन्यात झालेल्या सराव शिबिरातून भारताच्या युवा संघाची निवड झाली असून, या स्पर्धेत या खेळाडूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेतून मलेशिया येथे रंगणाऱ्या आगामी ज्युनिअर आशियाई चषक व पुढील वर्षीच्या एफआयएच ज्युनिअर वर्ल्डकप स्पर्धेसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी खेळाडूंना असल्याने प्रत्येक खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करण्याच्या प्रयत्नात असेल. हरजितसिंग कर्णधार असलेल्या या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी डिफेंडर दीप्सन तिर्की याची निवड झाली आहे. भारतीय संघ :गोलरक्षक : पंकजकुमार रजक, सूरज करकेरा.डिफेंडर : दीप्सन तिर्की (उपकर्णधार), विक्रमजितसिंग, हरमनप्रीतसिंग, वरुणकुमार, बलजितसिंग आणि आनंद लाक्रा.मिडफिल्डर : हरजितसिंग (कर्णधार), संतासिंग, मनप्रीत, नीलकांत शर्मा आणि अजय यादव.फॉर्वडर : सुमीतकुमार, अरमान कुरेशी, परविंदरसिंग, गुरजंतसिंग आणि सिमरनजीत सिंग. (वृत्तसंस्था)