शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

जोशने मारले, उमेशने तारले

By admin | Updated: December 19, 2014 01:18 IST

पहिल्या दिवशी सामन्यावर मजबूत पकड घेणा-या भारतीय संघाचा डाव दुसऱ्या दिवशी ४ बाद ३११ धावांवरून सर्वबाद ४०८ धावांवर आपटला.

ब्रिस्बेन : पहिल्या दिवशी सामन्यावर मजबूत पकड घेणा-या  भारतीय संघाचा डाव दुसऱ्या दिवशी ४ बाद ३११ धावांवरून सर्वबाद ४०८ धावांवर आपटला. आॅस्ट्रेलियाकडून पहिलीच कसोटी खेळणाऱ्या जोश हेजलवुडच्या भेदक माऱ्याने पाहुण्यांना हैराण केले. उपाहारापर्यंत भारताचे सहा फलंदाज ८७ धावांवर माघारी परतले आणि मजबूत स्थितीकडे वाटचाल करणारा भारतीय संघ ढेपाळला. मात्र, उमेश यादवने तीन विकेट्स घेत भारताला सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळवून दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी यजमानांच्या ४ बाद २२१ धावा झाल्या असून ते १८७ धावांनी पिछाडीवर आहेत. अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा या सेट फलंदाजांच्या बळावर दुसऱ्या दिवशी भारत मोठी धावसंख्या सहज उभी करेल असे अंदाज बांधले जाऊ लागले. मात्र, प्रत्यक्षात घडले वेगळेच. तिसऱ्याच षटकात शतकाची आस लावून बसलेल्या रहाणेला हेजलवुडने यष्टिरक्षक हॅडिनकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ रोहितही शेन वॉटसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला आणि बघताबघता भारत बॅकफुटवर गेला. सातव्या विकेटसाठी आर. अश्विन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी ११.१ षटकांत जवळपास पाचच्या सरासरीेने धावा चोपून ५७ धावांची भागीदारी केली. या जोडीला हेजलवुडची नजर लागली. हेजलवुडच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाज माघारी परतताच भारताचा डाव ४०८ धावांत संपुष्टात आला. हेजलवुडने पदार्पणातच ५ विकेट्स घेण्याची किमया केली. आॅस्ट्रेलियाची सुरुवात हवी तशी झाली नसली तरी सामन्यावर त्यांची पकड मजबूत होत होती. पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या ख्रिस रॉजर्स आणि फॉर्मात असलेल्या डेव्हिड वॉर्नर यांनी संयमी खेळ करून संघाला ४७ धावांची सलामी दिली. पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शतक ठोकणारा वॉर्नर उमेश यादवचा पहिला शिकार ठरला. यादवच्या बाऊंसरवर पुल मारण्याचा प्रयत्न वॉर्नरकडून फसला आणि चेंडू पहिल्या स्लिपला उभ्या असलेल्या आर. अश्विनच्या दिशेने टोलावला. अश्विनने धावत अगदी सहजपणे चेंडू झेलून वॉर्नरला तंबूत जाण्यास भाग पाडले. भारतासाठी ही विकेट मोठी दिलासा देणारी होती. याहून मोठा दिलासा भारताला २०व्या षटकात मिळाला. भारतासाठी नेहमी घातक ठरणाऱ्या शेन वॉटसनला आर. अश्विनने चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले. अश्विनने टाकलेला चेंडू वॉटसनने पुढे येत मिड आॅनवरून तो सीमारेषेपलीकडे मारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा फटका चुकला आणि मिड आॅनवर उभ्या असलेल्या शिखर धवनने झेल टिपून त्याला बाद केले. दुसऱ्या बाजूला रॉजर्स खेळपट्टीवर चिटकून होता आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. यादवच्या लेग साईडला जाणाऱ्या चेंडूला छेडण्याच्या नादात रॉजर्स यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी याच्या हातात सोपा झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर शॉन मार्श आणि कर्णधार स्टीवन स्मिथ या जोडीने चौथ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. ही जोडी मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच ४६व्या षटकात यादवने मार्शला बाद केले. यादवच्या बाऊंसरचा अंदाज मार्शला घेता आला नाही आणि स्लिपला उभ्या असलेल्या अश्विनने अप्रतिम झेल टिपून त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर स्मिथने एक बाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण करून संघाला दिवसअखेर ४ बाद २२१ धावांपर्यंत मजल मारून दिली. (प्रतिनिधी)