शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जॉन्टी ऱ्होड्सला पुत्ररत्न, "इंडिया"ला भेटला भाऊ

By admin | Updated: May 22, 2017 18:17 IST

रविवारचा दिवस मुंबई इंडियन्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्ससाठी दुहेरी आनंदाचा ठरला. काल संध्याकाळी जॉन्टीची पत्नी मिलानी हिने पुत्राला जन्म दिला

 मुंबई, दि. 22 - रविवारचा दिवस मुंबई इंडियन्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्ससाठी दुहेरी आनंदाचा ठरला. काल संध्याकाळी जॉन्टीची पत्नी मिलानी हिने पुत्राला जन्म दिला. तर रात्री मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावत आपल्या प्रशिक्षकाचा आनंद द्विगुणित केला.  याआधी जॉन्टीच्या पत्नीने भारतातच एका मुलीला जन्म दिला होता. भारतात जन्मल्याने जॉन्टीने तिचे नाव इंडिया असे ठेवले होते. आता भारतभूमीवरच इंजियाला भाऊ भेटला आहे. आता मुलग्याचा जन्मही भारतात झाल्याने जॉन्टी त्याचे नाव काय ठेवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
 
पत्नीच्या प्रसुतीवेळी जॉन्टी तिच्यासोबत नव्हता.  काल मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यातील आयपीएलच्या अंतिम लढतीसाठी तो हैदराबादला गेला होता. दरम्यान मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये जॉन्टीच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. पत्नीची प्रसुती झाल्यावर जॉन्टीने ट्विटरवरून आपल्या जगभरातील चाहत्यांना कळवली. 
 
याआधी 23 एप्रिल 2015 रोजी आयपीएल सुरू असतानाच जॉन्टी ऱ्होड्सच्या पत्नीने भारतातच मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी आपली मुलगी भारतात जन्मल्याने जॉन्टीने कौतुकाने तिचे नाव इंडिया असे ठेवले होते. योगायोगाची बाब म्हणजे जॉन्टीला मुलगी झाली त्यावेळीही मुंबई इंडियन्सने  आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याची किमया साधली होती. तर काल त्याला मुलगा झाल्यावरही मुंबईचा संघ आयपीएलमध्ये विजेता ठरला. अशा प्रकारे जॉन्टीच्या दोन्ही मुलांचा पायगुण मुंबई इंडियन्ससाठी यशदायी ठरला.