शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

जेएलटीटीए संघाचे विजेतेपद

By admin | Updated: June 19, 2015 02:06 IST

प्रशिक्षक सुहास राणे यांनी खेळाडू म्हणून सहभाग घेताना एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात गोमंतक एससी विरुध्द निर्णायक कामगिरी करत

मुंबई : प्रशिक्षक सुहास राणे यांनी खेळाडू म्हणून सहभाग घेताना एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात गोमंतक एससी विरुध्द निर्णायक कामगिरी करत जेएलटीटीए ‘अ’ संघाला आंतर क्लब टेबल टेनिस लीग स्पर्धेत द्वितीय श्रेणीचे विजेतेपद जिंकून दिले. त्याचवेळी गोरेगाव एससीने सांताक्रुझ जिम ‘अ’ संघाला नमवून पुरुष गटाच्या प्रथम श्रेणीची अंतिम फेरी निश्चित केली. मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने खार जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेच्या द्वितीय श्रेणी अंतिम सामन्यात जेएलटीटीए संघाने एकहाती वर्चस्व राखले. वरुण शेठने पहिल्या एकेरीच्या लढतीत दिनकर शेलारका याचा १२-१४, ८-११, ११-१, ११-३, ११-९ असा झुंजार पराभव करुन जेएलटीटीए संघाला आघाडीवर नेले. यानंतर सुहास राणेने देखील सरोश श्रॉफचा ११-६, ११-१, १३-११ असा धुव्वा उडवून संघाची आघाडी २-० अशी मजबूत केली. तिसऱ्या लढतीत मात्र गोमंतकच्या राम कदमने देव श्रॉफ विरुध्द १२-१०, ५-११, ११-८, ७-११, १२-१० असा खडतर विजय मिळवताना संघाची पिछाडी १-२ अशी कमी केली. यावेळी गोमंतक पुनरागमन करणार अशी अपेक्षा होती. परंतु, सुहास राणेने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना एकतर्फी झालेल्या एकेरी लढतीत दिनकर विरुध्द ११-६, ११-६, ११-८ असा दणदणीत विजय मिळवताना जेएलटीटीए संघाच्या विजेतेपदावर शिक्का मारला.पुरुष प्रथम श्रेणी गटामध्ये गोरेगाव एससी संघाने सांताक्रुझ जिम ‘अ’ संघाचा ३-१ असे नमवून अंतिम फेरी गाठली. सलामीच्या लढतीत गोरेगाव संघाचा मंदार हर्डीकर अनुभवी निशाद शाह विरुध्द ७-११, १०-१२, ७-११ असा पराभूत झाल्याने सांताक्रुझने १-० अशी आघाडी घेतली. यानंतर मात्र गोरेगाव संघाने आक्रमक खेळ करताना सांताक्रुझला पुनरागमनाची संधीच दिली नाही. पंकज कुमारने तुफानी खेळ करताना सांताक्रुझच्या कसलेल्या हर्ष मणियारचा ११-५, ११-८, ११-५ असा फडशा पाडून सामना बरोबरीत आणला. परेश मुरेकरने अटीतटीच्या सामन्यात ॠत्विक पंडीरकरचा १२-१०, ९-११, ३-११, ११-७, १२-१० असा पाडाव करुन संघाला २-१ असे आघाडीवर नेले. पुन्हा एकदा पंकजने निर्णायक खेळ करुन निशादचा ११-५, ८-११, ११-९, १५-१३ असा पाडाव केला व गोरेगावला अंतिम फेरी गाठून दिली. (क्रीडा प्रतिनिधी)सुहासचा निर्णायक खेळगोमंतक एससी संघाच्या विजेतेपदात प्रशिक्षक सुहास राणेने दोन एकतर्फी विजयांची नोंद करताना निर्णायक खेळ केला. सुहासने सरोशचा पराभव करुन संघाला मजबूत स्थितीत आणले. यानंतर संघाची आघाडी कमी झाल्यावर पुन्हा एकदा सुहासने आपल्या अनुभवाच्या जोरावर दिनकर शेलारकाचा धुव्वा उडवून संघाचे विजेतेपद निश्चित केले.