शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जीतू, हीना यांना एअर पिस्तुल मिश्र सांघिक गटात सुवर्ण, दीपक-मेघना चौथ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:32 IST

नवी दिल्ली : जीतू राय व हिना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्वकप फायनलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देताना १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत बाजी मारली.

नवी दिल्ली : जीतू राय व हिना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्वकप फायनलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देताना १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत बाजी मारली. राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणा-या राय व माजी राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेती सिद्धू यांचे मिश्र सांघिक स्पर्धेतील हे तिसरे सुवर्ण आहे. आयएसएसएफ विश्वकपमध्ये प्रथमच अधिकृतपणे मिश्र सांघिक स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. यंदा विश्वकपमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचा समावेश करण्यात आला आहे. टोकियो आॅलिम्पिक २०२०मध्ये प्रथमच मिश्र टीम स्पर्धेचा समावेश करण्यात येणार आहे.राय व सिद्धू यांनी पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावून अंतिम फेरी गाठली आणि त्यानंतर फ्रान्सचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. चीनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कर्णसिंह शूटिंग रेंजवर १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताचे दीपककुमार व मेघना सज्जनार यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चुकीच्या क्रमामध्ये नेम साधल्यामुळे भारतीय जोडीला दोन शॉटच्या पेनल्टीला सामोरे जावे लागले. असे झाले नसते तर त्यांना पदक जिंकण्याची संधी होती. जीतू व हिना जोडीने अंतिम फेरीत ४८३.४ गुणांची कमाई करून अव्वल स्थान पटकावले.आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके पटकावणारा राय १० मीटर फ्री पिस्तुल व ५० मीटर पिस्तुल स्पर्धेतही सहभागी होणार आहे.हिनाने विश्वकप फायनलमध्ये दुसºयांदा सुवर्णपदक पटकावले. तिने २०१३मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुलमध्ये वैयक्तिक सुवर्ण पटकावले होते. जीतूचे विश्वकप फायनलमध्ये हे दुसरे पदक आहे. त्याने गेल्या वर्षी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुलमध्ये रौप्यपदक पटकावले होते.हिना म्हणाली, ‘‘आपल्या लोकांपुढे विजय मिळविल्यामुळे चांगले वाटते. दरम्यान, याचा आमच्यावर अतिरिक्त दबावही होता. आमच्याकडून लोकांना आशाहोती. सर्वांची नजर आमच्या कामगिरीवर होती. त्यामुळे आम्ही एकत्र सरावही केला.’’राय म्हणाला, ‘‘स्पर्धेचा हा प्रकार मला आवडतो. अन्य स्पर्धांच्या तुलनेत याला अधिक वेळ लागतो; पण आम्हाला आवडतो.’’मिश्र टीम ट्रॅपमध्ये स्पेनच्या एंटोनियो बैलोन व बिटाईस मार्टिनेजने फायनल राऊंडमध्ये ५० पैकी ४२ गुणांची कमाई करून सुवर्णपदक पटकावले. त्यांनी इटलीच्या जियोवानी पेलियो व जेसिका रोसी यांचा पराभव केला. डेन्मार्कच्या डेरेक हेल्डमॅन व अ‍ॅश्ले कॅरोल यांनी कांस्यपदक पटकावले.