शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जेरेमी लालरिनुंगाने रचला युवा विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 03:47 IST

युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिनुंगा याने रविवारी आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रमी कामगिरीसह आपल्या गटात दुसरे स्थान पटकावले.

निंगबो : माजी विश्वचॅम्पियन मीराबाई चानूने आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली, पण तरीही थोड्या फरकाने तिला कांस्यपदकापासून वंचित रहावे लागले. दुसरीकडे युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिनुंगा याने रविवारी आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रमी कामगिरीसह आपल्या गटात दुसरे स्थान पटकावले.जेरेमीने ‘ब’ गटात ६७ किलोमध्ये स्नॅचमध्ये युवा विश्व व आशियाई विक्रम मोडला. त्याने तीनपैकी दोन प्रयत्नांमध्ये १३० व १३४ किलो वजन पेलले. त्याने यंदा १३१ किलो वजन पेलले होते. जेरेमीने क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये आपल्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत दुप्पट वजन दोन यशस्वी प्रयत्नांमध्ये (१५७ व १६३ किलो) पेलले. त्याने कजाखस्तानच्या साईखान तेइसुयेवचा १६१ किलोचा विक्रम मोडला.जेरेमीने एकूण २९७ किलो वजन उचलले. तो पाकिस्तानच्या ताल्हा तालिबच्या तुलनेत पिछाडीवर राहिला. त्याने ३०४ किलो वजन पेलले. ही स्पर्धा आॅलिम्पिक पात्रता स्पर्धा आहे. त्यातील गुणांची टोकियो आॅलिम्पिक २०२० च्या अखेरच्या रँकिंगमध्ये दखल घेण्यात येईल.मीराबाईने ४९ किलो गटात आपली सर्वोत्तम कामगिरी केली, पण ती कांस्यपासून थोडक्यात वंचित राहिली. तिने स्नॅचमध्ये ८६ किलो वजन उचलले व क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना ११३ किलो वजन पेलले. तिने एकूण १९९ किलो वजन उचलले. यापूर्वी चानूची सर्वोत्तम कामगिरी १९२ किलो होती. चीनच्या झांग रोंगनेही १९९ किलो वजन पेलले. पण नव्या नियमानुसार ती कांस्यची मानकरी ठरली. या नियमानुसार क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये कमी वजन उचलणाऱ्या खेळाडूला एकूण वजन गटात वरचे स्थान मिळते. चीनच्या होऊ झिहुईने सुवर्ण, तर उत्तर कोरियाच्या रि सोंग गमने रौप्यपदक पटकावले.आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघातर्फे गेल्या वर्षीवजनगटात बदल करण्यात आल्यानंतर मीराबाईची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ती यापूर्वी ४८ किलो वजनगटात सहभागी होत होती. तिने थायलंड एजीएटी कपमध्ये ४९ किलो गटात सुवर्णपदक पटकावले होते.

टॅग्स :Weightliftingवेटलिफ्टिंग