शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

जयश्री, सोनियाला सुवर्ण : विश्व पोलिस फायर स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:30 IST

अमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. त्यात कोल्हापूरच्या जयश्री बोरगी, मुंबईची सोनिया मोकल यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर मुंबईच्याच रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटकाविले.

 कोल्हापूर : अमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. त्यात कोल्हापूरच्या जयश्री बोरगी, मुंबईची सोनिया मोकल यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर मुंबईच्याच रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटकाविले.लॉस एंजिल्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने ५ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठोपाठ सोनिया मोकल हिने ८०० मीटर धावणे स्पर्धेत देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. ७१ किलोगटात ग्रीको रोमन प्रकारात मुंबईच्या रवींद्र जगतापने रौप्यपदक मिळवून दिले.सन २०१५ मध्ये अमेरिकेतील फेअर फॅक्स राज्यातील व्हर्जिनिया येथे झालेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्यासह तिने भारतीय पोलीस दलातील धावपटू रहमान याने नोंदविलेला ११:३१:२९ ही विक्रमी वेळही मोडत ११:०३:२१ अशी वेळ नोंदवत ५००० मीटर व १०००० मीटर धावण्यात सुवर्ण, तर ५००० मीटर चालण्यात रौप्यपदकाची कमाई केली होती. अशाप्रकारची कामगिरी करणारी ती पोलीस दलातील एकमेव महिला धावपटू ठरली आहे.जयश्री, सोनिया व रवींद्र यांच्या कामगिरीचा आनंद आहे. या तिघांचीही कामगिरी चांगली होती. खरं म्हणजे तिची मुख्य स्पर्धा १५०० मीटरची आहे आणि त्यातही ती नक्कीच सुवर्ण पटकावेल. अमेरिकेतील वातावरणाची दखल घेत जयश्रीचा सराव कोल्हापूरला घेतला. त्याचा खूप फरक पडला. देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याचा आत्मविश्वास तिच्याकडे आहे. जयश्रीने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ तिला मिळाले. आम्हाला तिच्या यशाचा खूप आनंद आहे. या तिघांच्या यशामध्ये पोलिस दलातील क्रीडाधिकारी बाजीराव कलंतरे यांचासुद्धा महत्त्वाचा वाटा आहे.- भिमा मोरे (प्रशिक्षक)