शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लीजेंड टी-२० साठी जयवर्धनेला प्रस्ताव

By admin | Updated: May 19, 2015 01:35 IST

श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेला प्रस्तावित लीजेंड टी-२० मध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला.

नवी दिल्ली : श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेला प्रस्तावित लीजेंड टी-२० मध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला. भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर व आॅस्ट्रेलियाचा शेन वॉर्न या लीगला प्रमोट करीत आहेत.जयवर्धनेच्या नजीकच्या सूत्राने सांगितले, की लीजेंड टी-२० साठी माहेलासोबत संपर्क साधण्यात आला. नाव उघड न करण्याच्या अटीवर सूत्राने सांगितले, की तेंडुलकर व वॉर्न यांच्या लीगमध्ये खेळण्यासाठी माहेलासोबत संपर्क साधण्यात आला. लीगमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मिळाला असून, अद्याप बऱ्याच बाबींचा खुलासा झालेला नाही.या प्रस्तावित लीजेंड टी-२० सामन्यांमध्ये जयवर्धने सहभागी होण्याची ९० टक्के शक्यता आहे. या घटनेबाबत माहिती असलेला एक अधिकारी म्हणाला, ‘‘माहेला जयवर्धनेने तिन्ही प्रकारांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. जगातील काही निवडक टी-२० लीगमध्ये तो खेळणार आहे. त्यानंतर त्याच्याकडे वेळ आहे. त्यामुळे प्रस्ताव स्वीकारण्यास कुठली अडचण दिसत नाही.’’निवृत्ती स्वीकारणाऱ्या जवळजवळ २८ क्रिकेटपटूंसोबत लीगसाठी संपर्क साधण्यात आला. या लीग स्पर्धेतील सामने अमेरिकेतील न्यूयॉर्क, शिकागो व लॉस एंजिल्स या शहरांमध्ये खेळले जाणार आहे. पहिली लीग स्पर्धा यंदा आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. लीगमध्ये सर्व प्रदर्शनी सामने होणार असून, त्याला अधिकृत मान्यता मिळणार नाही, पण आयोजकांना मात्र मंजुरीसाठी आयसीसीकडे संपर्क करावा लागू शकतो. आयसीसीचा एक प्रवक्ता म्हणाला, ‘‘आयसीसीला प्रस्तावित लीगबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही. अशा प्रकारच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी एक प्रक्रिया असते. याबाबत आयसीसीसोबत संपर्क साधल्यानंतर त्याबाबत दखल घेण्यात येते.’’ वॉर्न, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, अ‍ॅलन डोनाल्ड, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, विंडीजचा ब्रायन लारा यांच्या व्यतिरिक्त ब्रेट ली, मॅथ्यू हेडन, अ‍ॅडम गिलख्रिस्ट व रिकी पॉन्टिंग या लीगमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)