शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
7
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
8
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
9
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
10
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
11
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
12
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
13
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
14
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
15
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
16
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
17
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
18
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
19
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
20
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान

जैशाने मोडला १९ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम

By admin | Updated: January 19, 2015 06:11 IST

आशियाई स्पर्धेतील १,५०० मीटर व ५,००० मीटर स्पर्धेतील पदक विजेत्या भारतीय धावपटू ओ़ पी़ जैशा हिने मुंबई मॅरेथॉनमधील पदार्पण अविस्मरणीय

मुंबई : आशियाई स्पर्धेतील १,५०० मीटर व ५,००० मीटर स्पर्धेतील पदक विजेत्या भारतीय धावपटू ओ़ पी़ जैशा हिने मुंबई मॅरेथॉनमधील पदार्पण अविस्मरणीय बनविला. तिने २ तास ३७ मिनिटे व २९ सेकंदांची वेळ नोंदवून वॅली सत्यभामा यांच्या १९ वर्षांपूर्वीच्या २ तास ३९ मिनिटे आणि १० सेकंदांच्या विक्रमाला मागे टाकले. या विक्रमाबरोबरच जैशाने भारतीय महिला गटाचे जेतेपद पटकावले आणि बीजिंगमध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे तिकीटही मिळवले. विश्व अजिंक्यपद स्पर्धेकरिता अ‍ॅथलेटिक फेडरेशन आॅफ इंडियाकडून (एएफआय) देण्यात आलेल्या २ तास ४४ मिनिटांच्या वेळेपूर्वीच जैशाने मॅरेथॉन पूर्ण केली. त्यापाठोपाठ गतविजेत्या ललिता बाबरने (९वे) २ तास ३८ मिनिटे व २१ सेकंदांची, तर सुधा सिंगने (११ वे) २ तास ४२ मिनिटे व १२ सेकंदांची नोंद करीत भारतीय महिला गटात अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. या कामगिरीच्या बळावर या दोघींनीही विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. जैशा व ललिता या दोघींना प्रशिक्षक डॉक्टर निकोलाई स्नेसारेव यांचे मार्गदर्शन मिळत आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत ५,००० मीटर व मॅरेथॉन यापैकी कोणत्या प्रकारात खेळणार असल्याचे जैशाला विचारले असता ती म्हणाली, मी आताच सांगू शकत नाही. प्रशिक्षक जे ठरवितील त्या प्रकारात मी खेळेन. जैशा बीजिंगमध्ये ५,००० मीटर व १०,००० मीटर स्पर्धेत खेळू शकते, तर ललिता ५,००० मीटर व ३,००० मीटर स्टीपलचेस प्रकारात खेळेल, अशी माहिती स्नेसारेव यांनी दिली. दुसरीकडे मात्र भारतीय पुरुषांना विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यात अपयश आले. पुरुष गटात अव्वल आलेल्या करण सिंगने २ तास २१ मिनिटे ३५ सेकंदांची वेळ नोंदवली. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अर्जुन प्रधान व बहादूर सिंग धोनी यांनी अनुक्रमे २ तास २२ मिनिटे व २२ सेकंदांची व २ तास २२ मिनिटे ४१ सेकंदांची वेळ नोंदवली. (क्रीडा प्रतिनिधी)