शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया दौऱ्यात गवसला जसप्रीत

By admin | Updated: February 3, 2016 03:12 IST

भारताला आॅस्ट्रेलियात टी-२० मालिकेत ३-० ने ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा गुजरातचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रशंसा केली

नवी दिल्ली : भारताला आॅस्ट्रेलियात टी-२० मालिकेत ३-० ने ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा गुजरातचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रशंसा केली. बुमराह या दौऱ्याचे फलित असल्याचे धोनीने म्हटले आहे. धोनीने गोलंदाजीची विचित्र शैली असलेल्या बुमराहची प्रशंसा करताना म्हटले की,‘मला नेहमी गोलंदाजीबाबत चिंता भासत होती. आता आगामी काही कालावधीसाठी टी-२० क्रिकेट खेळणार असल्यामुळे सध्या गोलंदाजी समतोल भासत आहे. बुमराह या दौऱ्याचे फलित आहे. गेल्या तीन लढतींमध्ये त्याने शानदार गोलंदाजी केली. बुमराहमध्ये प्रतिभा असून, त्याच्यात भेदक यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे. मर्यादित षटकांच्या लढतींमध्ये यशस्वी ठरण्यासाठी यॉर्करवर हुकूमत असणे आवश्यक असते.’ बुमराहला विचित्र शैलीमुळे भारताचा लसिथ मलिंगा म्हटले जात आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज साइड आर्म शैलीमुळे जगात ओळखला जातो. बुमराहची शैलीही मलिंगासोबत मिळती जुळती आहे. गुजरातच्या या वेगवान गोलंदाजाने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन टी-२० लढतींमध्ये आपल्या शैलीने आणि बळी घेण्याच्या क्षमतेमुळे क्रिकेट जाणकारांचे लक्ष वेधले आहे. बुमराहने टीम इंडियाच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीमध्ये एकमेव वन-डे सामना खेळला होता. त्यात त्याने दोन बळी घेतले होते, पण अ‍ॅडिलेड व मेलबोर्नमध्ये पहिल्या दोन टी-२० लढतींमध्ये बुमराह भारतीय गोलंदाजीचा हीरो ठरला. अ‍ॅडिलेडमध्ये त्याने २३ धावांच्या मोबदल्यात ३, तर मेलबोर्नमध्ये ३७ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्याने तिसऱ्या लढतीत ४३ धावांत एका फलंदाजाला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)त्याचे काही तोटेही आहेत. मी गोलंदाजी शैलीबाबत मलिंगासोबत बरीच चर्चा केली. मलिंगाची शैलीही वेगळी आहे. अशा शैलीमुळे कुठेही गोलंदाजी करता येते आणि शैली बदलण्याची गरज नाही. या शैलीमुळे तुला सहजता वाटत असेल तर शैलीमध्ये बदल करण्याची काहीच गरज नाही, असे मलिंगाने मला त्या वेळी सांगितले होते.- जसप्रीत बुमराह