शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जसप्रीत बुमराहची द्वितीय स्थानी झेप

By admin | Updated: June 28, 2017 00:47 IST

डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह याने कारकिर्दीत टी२० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये सर्वोत्तम स्थान मिळवताना दुसरे स्थान मिळवले आहे.

दुबई : डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह याने कारकिर्दीत टी२० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये सर्वोत्तम स्थान मिळवताना दुसरे स्थान मिळवले आहे. त्याचवेळी, भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच, अव्वल तीन अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून बांगलादेशचा शाकिब अल हसन अग्रस्थानी आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज इमाद वसीम याने टी२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचवेळी, इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरने आपले अव्वल स्थान गमावले. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला २-१ असे नमविल्यानंतर एक दिवसाने नवी टी२० क्रमवारी जाहीर झाली. ताहिरला दोन सामन्यांतून केवळ एकच बळी घेण्यात यश आले.ताहिरची तिसऱ्या स्थानी घसरण झाल्यानंतर त्याचा फायदा इमादला झाला आणि त्याने अव्वल स्थानी झेप घेतली. तसेच बुमराहनेही आगेकूच करताना दुसऱ्या स्थानी कब्जा केला. फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये कोहली, आॅस्टे्रलियाचा अ‍ॅरोन फिंच आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन यांनी आपआपले अव्वल तीन स्थान कायम राखले आहे. (वृत्तसंस्था)