शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

जाधवची धमा‘केदार’ झुंज अपयशी

By admin | Updated: January 23, 2017 00:22 IST

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात इंग्लंडने ५ धावांनी बाजी मारत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात यजमान भारताचा पराभव केला.

कोलकाता : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात इंग्लंडने ५ धावांनी बाजी मारत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात यजमान भारताचा पराभव केला. पहिले दोन सामने सहजपणे जिंकत भारताने या मालिकेवर कब्जा केला. मराठमोळ्या केदार जाधवने पहिल्या सामन्याप्रमाणे पुन्हा एकदा धमा‘केदार’ खेळी केली. परंतु, अखेरच्या षटकात तो बाद झाल्याने भारताला निसटता पराभव पत्करावा लागला.सलग तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांनी ३००हून अधिक धावा काढल्या. प्रथम फलंदाजी करून इंग्लंडने भारतापुढे ३२२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची मजल ५० षटकांत ९ बाद ३१६ अशी मर्यादित राहिली. अडखळत्या सुरुवातीनंतर प्रमुख फलंदाज फारशी चमक न दाखवता बाद झाल्यानंतर केदारने पुन्हा एकदा पहिल्या सामन्याचा ‘रिप्ले’ करताना जबरदस्त फटकेबाजी करून इंग्लंडवर दबाव आणला. त्याने ७५ चेंडंूत १२ चौकार व एक षटकार ठोकून शानदार ९० धावा काढल्या. अखेरच्या षटकापर्यंत त्याने इंग्लंडला प्रचंड दबावाखाली ठेवले होते. मात्र, या षटकातील ५व्या चेंडूवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात ख्रिस वोक्सच्या चेंडूवर तो बाद झाला आणि सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकला. धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. मालिकेत पहिल्यांदा संधी मिळालेला मुंबईकर अजिंक्य रहाणे केवळ एक धाव काढून बाद झाल्यानंतर लोकेश राहुलही (११) झटपट परतला. यामुळे भारताची ६ षटकांत २ बाद ३७ अशी अवस्था झाली. यानंतर, कर्णधार विराट कोहली (५५) आणि युवराज सिंग (४५) यांनी ६५ धावांची भागीदारी केली. स्टोक्सने कोहलीला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर युवराज, महेंद्रसिंह धोनी (२५) ठराविक अंतराने बाद झाले. हार्दिक पांड्या (५६)-केदार यांनी १०४ धावांची जबरदस्त भागीदारी करून भारताच्या आशा उंचावल्या. ४६व्या षटकात पांड्याला त्रिफळाचीत केले. पांड्याने ४३ चेंडूत ४ चौकार, २ षटकारांसह आपली खेळी सजवली. यानंतर, सर्व सुत्रे आपल्याकडे घेत केदारने एकट्याने इंग्लंडला झुंजवले. परंतु, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

केदार जाधवचा शोध आमच्यासाठी शानदार ठरला आहे. गतवर्षी आम्ही त्याचे समर्थन केले. त्याला जास्त सामने खेळण्यास मिळाले नाहीत. मात्र, त्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. तो युवी आणि धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देतो आणि खेळाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतो. केदार अमूल्य आहे. हार्दिकही स्वत:ला अष्टपैलू म्हणून सिद्ध करीत आहे. खेळपट्टी पाहूनच मला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ही खेळपट्टीची चांगली तयारी असल्याचे जाणवले. - विराट कोहली

मी सर्व सहा चेंडू खेळण्याची योजना बनवत होतो. मला माहीत होते यात मी यशस्वी झालो असतो, तर गोलंदाज दबावाखाली आले असते. ज्या चेंडूवर मी बाद झालो त्यावर मोठा फटका मारण्याच्या स्थितीत मी नव्हतो. कारण मी स्थिर नव्हतो आणि यामुळेच बाद झालो. - केदार जाधव

या सामन्याची खेळपट्टी इंग्लंडप्रमाणे होती. नाणेफेक हरल्यानंतर तुम्हाला त्या खेळपट्टीचा सामना करावा लागतो. दवाचा सामना करण्यात खूप परिश्रम करावे लागले. जेसन रॉय, सॅम बिलिंग्स यांनी आघाडीला चांगली कामगिरी केली. गोलंदाजांनी संघाला चांगल्या स्थितीत ठेवले. मोक्याच्या वेळी बळी मिळवल्याचा फायदा झाला.- इयॉन मॉर्गन अखेरच्या षटकातील थरारगोलंदाज : ख्रिस वोक्स, १६ धावांची गरजपहिला चेंडू : केदारने एक्स्ट्रा कव्हरमध्ये षटकार ठोकला.दुसरा चेंडू : केदारने पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चौकार मारला.तिसरा चेंडू : निर्धाव. चौथा चेंडू : निर्धाव. पाचवा चेंडू : डीप पॉइंटमध्ये षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात केदार झेलबाद. सामना इंग्लंडकडे झुकला.सहावा चेंडू : भुवनेश्वर फटका मारण्यात चुकला. इंग्लंड विजयी.धावफलक-इंग्लंड : जेसन रॉय त्रि. जडेजा ६५, सॅम बिलिंग्ज झे. बुमराह गो. जडेजा ३५, बेअरस्टॉ झे. जडेजा गो. पंड्या ५६, मॉर्गन झे. बुमराह गो. पंड्या ४३, बटलर झे. राहुल गो. पंड्या ११,, बेन स्टोक्स नाबाद ५७, मोईन अली झे. जडेजा गो. बुमराह २, वोक्स धावबाद कुमार/धोनी ३४, प्लंकेट धावबाद पांडे/धोनी १, अवांतर : १७ एकूण : ५० षटकांत ८ बाद ३२१. गोलंदाजी : भुवनेश्वर ८-०-५६-०, पंड्या १०-१-४९-३, बुमराह १०-१-६८-१, जडेजा १०-०-६१-२, आश्विन ९-०-६०-०, युवराज ३-०-१७-०.भारत : अजिंक्य रहाणे त्रि. गो. विली १, लोकेश राहुल झे. बटलर गो. बॉल ११, विराट कोहली झे. बटलर गो. स्टोक्स ५५, युवराज सिंग झे. बिलिंग्ज गो. प्लंकेट ४५, महेंद्रसिंह धोनी झे. बटलर गो. बॉल २५, केदार जाधव झे. बिलिंग्ज गो. वोक्स ९०, हार्दिक पंड्या गो. स्टोक्स ५६, रवींद्र जडेजा झे. बेअरस्टो गो. वोक्स १०, रविचंद्रन आश्विन झे. वोक्स गो. स्टोक्स १, भुवनेश्वर कुमार नाबाद ०, जसप्रीत बुमराह नाबाद ०, अवांतर २२, एकूण : ५० षटकांत ९ बाद ३१६. गोलंदाजी : वोक्स १०-०-७५-२, विली २-०-८-१, बॉल १०-०-५६-२, प्लंकेट १०-०-६५-१, स्टोक्स १०-०-६३-३, अली ८-०-४१-०.