फोर्टालेजा : आयव्हरी कोस्ट आणि ग्रीस हे संघ फिफा फुटबॉल विश्वचषकातील ‘क’ गटात मंगळवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत़ यापूर्वी एकदाही या संघांना विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश करता आलेला नाही़ त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवून नवा इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरतील़
आयव्हरी कोस्टने आपल्या पहिल्या लढतीत जपानवर 2-1 ने मात केली होती़ त्यामुळे त्यांनी ग्रीस विरुद्धचा सामना जिंकला किंवा बरोबरीत सोडविला तरीही हा संघ अंतिम 16 संघांत आपले स्थान निश्चित करण्याची शक्यता आह़े
मात्र ग्रीसला बाद फे रीत प्रवेश मिळवायचा असेल तर त्यांना या लढतीत विजय मिळवावाच लागणार आह़े विश्वचषक स्पर्धेत ग्रीसची आतार्पयतची कामगिरी खराबच राहिली आह़े
दुसरीकडे आयव्हरी कोस्टची विश्वचषकातील कामगिरी थोडी चांगला आह़े यावेळी विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात त्यांनी 2-1 ने पराभूत केले आहे; मात्र दुस:या लढतीत त्यांना कोलंबियाकडून 1-2 अशी मात खावी लागली होती़ त्यामुळे बाद फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना ग्रीसविरुद्ध विजय मिळवावाच लागणार आह़े (वृत्तसंस्था)