शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

इव्हानोव्हीच व सफारोव्हा उपांत्य फेरीत

By admin | Updated: June 3, 2015 00:36 IST

अ‍ॅना इव्हानोव्हीचने मंगळवारी युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचा पराभव करीत सात वर्षांत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले.

पॅरिस : अ‍ॅना इव्हानोव्हीचने मंगळवारी युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचा पराभव करीत सात वर्षांत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. इव्हानोव्हिचने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. २००८ मध्ये पॅरिसमध्ये एकमेव ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या इव्हानोव्हिचने स्वितोलिनाचा ६-३, ६-२ ने पराभव केला. स्वितोलिनाविरुद्ध सात सामन्यांतील इव्हानोव्हिचचा हा सातवा विजय आहे. शनिवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत स्थान मिळवण्यासाठी इव्हानोव्हिचला उपांत्य फेरीत चेक प्रजासत्ताकच्या १३ व्या मानांकित लुसी सफारोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सफारोव्हाने उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतीत २१ व्या मानांकित स्पेनच्या गारबाइन मुगुरुजाचा ७-६, ६-३ ने पराभव केला. इव्हानोव्हिचने कारकीर्दीत पाचव्यांदा ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यापूर्वी रोला गॅरोमध्ये इव्हानोव्हिचने २००७ व २००८ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. २००७ मध्ये विम्बल्डन व २००८ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतही इव्हानोव्हिचने अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळवले होते.त्याआधी, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, स्पेनचा राफेल नदाल व ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित जोकोव्हिचने २० व्या मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केचा ६-१, ६-२, ६-३ ने पराभव केला. जोकोव्हिचला उपांत्यपूर्व फेरीत सहावे मानांकन प्राप्त स्पेनच्या राफेल नदालच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. नदालने अमेरिकेच्या जॅक साकविरुद्ध ६-३, ६-१, ५-७, ६-२ ने विजय मिळवला. त्याआधी, फेडररने चौथ्या फेरीच्या लढतीत १३ व्या मानांकित फ्रान्सच्या गेल मोंफिल्सचा ६-३, ४-६, ६-४, ६-१ ने पराभव केला. फेडररला पुढच्या फेरीत स्टेनिसलास वावरिंकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मरेने फ्रान्सच्या जर्मी चार्डीविरुद्ध ६-४, ३-६, ६-३, ६-२ ने सरशी साधली. मरेला उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. महिला विभागात चौथ्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्वितोवाला पराभव स्वीकारावा लागला. २३ व्या मानांकित स्वित्झर्लंडच्या टिमिया बासिनस्कीने क्वितोव्हाचा २-६, ६-०, ६-३ ने पराभव करीत पुढची फेरी गाठली.