शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

महेंद्रसिंह धोनीला रोखणे अशक्य

By admin | Updated: May 24, 2016 04:20 IST

एका बाजूला काही संघ आयपीएलच्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवण्यासाठी तयारी करीत होते, तर महेंद्रसिंह धोनीने माघारी परतण्यासाठी आपली बॅग पॅकसुद्धा केली होती. आयपीएलच्या यंदाच्या

- रवी शास्त्री लिहितो़...एका बाजूला काही संघ आयपीएलच्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवण्यासाठी तयारी करीत होते, तर महेंद्रसिंह धोनीने माघारी परतण्यासाठी आपली बॅग पॅकसुद्धा केली होती. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात धोनीची छाप मात्र दिसत नव्हती. दुखापतीचा व्हायरस त्याच्या खेळाडूला एकापाठोपाठ लक्ष्य करीत होता. सर्वत्र अडचणीची स्थिती असताना उत्तर मात्र कुठेच सापडत नव्हते. आयपीएलच्या साखळी फेरीतील अखेरच्या टप्प्यात धोनीने मात्र आपली म्यान केलेली तलवार बाहेर काढली. त्यासाठी आम्ही त्याचा आदर करतो. आम्हाला त्याची ती पूर्वीची झलक दिसली. एका षटकात २३ धावांची गरज असताना चाहते आशा सोडून स्टेडियममधून काढता पाय घेतात. पण, येथे असे नव्हते. चाहते स्टेडियममध्ये कायम होते. प्रत्येक चाहता अखेरपर्यंत लढत बघण्यास उत्सुक होता. असे असताना धोनीविरुद्ध अखेरच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपविण्यात आली. धोनी अशी शक्ती आहे, की तिला रोखणे अशक्य आहे. आमलाचे अफलातून क्षेत्ररक्षण आणि मैदानात शिरलेल्या एका श्वानामुळे क्लायमॅक्स थोडा वेळ टळला. या षटकात दोन चेंडू निर्धाव होते, हेही लक्ष्यात घ्यायला हवे. असे असले तरी धोनीची बॅट अखेरचा अडथळा पार करण्यात यशस्वी ठरली. धोनी भारतीय क्रिकेटचा नायक आहे. यशाच्या सर्वोच्च शिखरावरही त्याचे पाय जमिनीवरच होते. भावना व्यक्त करण्यावर त्याचा विश्वास नाही. तो आव्हानांची प्रतीक्षा करतो आणि स्वत:ला प्रेरित करतो. सर्व अडथळे पार करून हा टप्पा गाठणाऱ्या व्यक्तीसाठी हे सर्व काही सोपे असते. यश व अपयशाचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही, हे धोनीने आत्मसात केले आहे. केवळ क्रिकेटच नाही तर सर्वसाधारण व्यक्तींच्या जीवनासाठीही धोनी रोल मॉडेल आहे. धोनीची जेवढी प्रशंसा केली जाते त्यापेक्षा अधिक प्रशंसेचा तो हकदार आहे. कुठला खेळाडू त्यापेक्षा अधिक फिट आहे, सध्याच्या काळात त्याच्यापेक्षा चांगला यष्टिरक्षक कोण आहे, यापेक्षा सर्वोत्तम फिनिशर कोण आहे, असे प्रश्न आपण स्वत:लाच विचारायला हवेत. मी नेहमीच म्हणतो, की अशा व्यक्तीला एकटे सोडा. वास्तविक बघता गुणतालिकेत दिसतो तेवढा पुणे संघ नक्कीच कमकुवत नव्हता. काही चुरशीच्या लढतीचे निकाल, काही सामन्यांतील नाणेफेकीचा कौल पुणे संघाच्या बाजूने असते तर निकाल वेगळा असता. ही काही कारणे नाहीत, पण असे घडू शकले असते. पुणे संघाने मोहिमेची सुरुवात व शेवट विजयाने केला. भविष्यात पुणे संघासाठी मधल्या कालावधीतील लढतीचे निकालही अनुकूल ठरतील, अशी आशा आहे. (टीसीएम)