शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल!: पी. व्ही. सिंधू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 07:48 IST

मी पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल; पण आयुष्यात पुढे जात असताना मी तो पचवून घेईन, याची मला खात्री आहे.

पॅरिस : स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. २०१६ ची रौप्य आणि २०२० ची कांस्य विजेत्या सिंधूला तिसरे ऑलिम्पिक पदक जिंकता आले नाही. चीनच्या खेळाडूने सरळ गेममध्ये तिचा पराभव केला. पराभवानंतर सिंधूने भावनिक पोस्ट लिहिली. 'हा पराभव माझ्या कारकिर्दीत सर्वांत कठीण आहे. मी पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल; पण आयुष्यात पुढे जात असताना मी तो पचवून घेईन, याची मला खात्री आहे.

पॅरिस २०२४ चा प्रवास ही एक लढाई होती. मागील दोन वर्षे दुखापतीमुळे मी खेळापासून बराच काळ दूर होते. या आव्हानांना न जुमानता मी येथे उभी राहिली आणि तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करू शकले हे मी माझे भाग्य समजते. या स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आणि त्याहूनही महत्त्वाचे, एका पिढीला प्रेरणा देण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. या काळात तुमचा पाठिंबा, शुभेच्छा मोठ्या दिलासा देणाऱ्या ठरल्या. माझ्या भविष्याबाबत मी स्पष्ट करू इच्छिते की, पुढेही खेळत राहणार. पण, तूर्तास एक छोटा ब्रेक घेत आहे. माझे शरीर आणि मनाला ब्रेकची गरज आहे. पुढच्या प्रवासाची रूपरेषा नियोजितपणे आखून पुढे चालत राहू.' 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४PV Sindhuपी. व्ही. सिंधू