ईशांत
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
ईशांत कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा आठवा भारतीय गोलंदाज
ईशांत
ईशांत कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा आठवा भारतीय गोलंदाजकोलंबो : ईशांत शर्माने आज श्रीलंकेचा कर्णधार ॲन्जेलो मॅथ्यूजला बाद करीत कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा पल्ला गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ईशांत भारताचा आठवा गोलंदाज ठरला आहे. कारकिर्दीतील ६५ वा कसोटी सामना खेळणाऱ्या ईशांतने तिसऱ्या कसोटी सामन्यात चहापानाच्या विश्रांतीनंतर मॅथ्यूजला पायचित करीत कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी घेतला. त्याला त्यासाठी अशी कामगिरी करणाऱ्या अन्य भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत अधिक सामने खेळावे लागले. यापूर्वी जहीर खानने ६३ सामन्यांत २०० बळींचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने १०२ व्या, विंडीजच्या गॅरी सोबर्सने ८० व्या आणि इंग्लंडच्या ॲण्ड्य्रू फ्लिन्टॉफने ६९ व्या सामन्यात २०० वा बळी घेतला होता, पण हे तीन्ही स्पेशालिस्ट गोलंदाज नव्हते. संघामध्ये त्यांची भूमिका अष्टपैलू म्हणून होती. ईशांतपूर्वी भारतातर्फे ज्या गोलंदाजांनी २०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत त्यात अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजनसिंग (४१७), जहीर खान (३११), बिशनसिंग बेदी (२६६), भागवत चंद्रशेखर (२४२) आणि जवागल श्रीनाथ (२३६) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)