शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलमध्ये कोणीच खरेदी न केल्याने इरफानचं भावनिक पत्र

By admin | Updated: February 22, 2017 17:13 IST

आयपीएलमध्ये खरेदी न केल्याने इरफान पठाण भावनिक झाला असून त्याने पत्राच्या माध्यमातून आपला संघर्ष मांडला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22  - आयपीएल खेळाडूंच्या लिलावात एकाही फ्रॅन्चायझीने आपल्याला घेण्यास रस न दाखवल्याने नाराज झालेल्या भारतीय क्रिकेटर इरफान पठाणने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोणीही आपल्याला खरेदी न केल्याने इरफान पठाण भावनिक झाला असून त्याने पत्राच्या माध्यमातून आपला संघर्ष मांडला आहे. 
 
इरफान पठाणला आयपीएलमध्ये 50 लाखांची मूळ किंमत ठेवण्यात आली होती. इरफान पठाणला चांगली किंमत मिळेल असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र त्याउलट नवख्या खेळाडूंना घेण्यात अनेक फ्रॅन्चायझीने रस दाखवला.  मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत इरफान पठाने एक-दोन चांगल्या खेळी केल्या, पण फ्रॅन्चायझी मालकांना आकर्षित करण्यात तो अपयशीच ठरला. 
(स्मिथ, धोनीसह ड्रेसिंग रूम शेअर करण्यास स्टोक्स उत्सुक)
(स्टोक्स व मिल्सला मोठी रक्कम)
 
ही गोष्ट इरफानच्या मनाला जास्तच बोचली असून ट्विटरच्या माध्यमातून पत्र शेअर करत त्याने पाच वेळा फ्रॅक्चर होऊनदेखील क्रिकेट खेळण्याचं स्वप्न मागे पडू न देता कसा लढा दिला याबद्दल सांगितलं आहे. 
 
'2010 रोजी माझ्या पाठीला पाच फ्रॅक्चर झाले होते. मी आता कदाचित कधीच खेळू शकत नाही, आणि क्रिकेटला मला अलविदा करावा लागेल असं फिजिओने मला सांगितलं होतं. यावेळी मी कोणत्याही वेदना झेलायला तयार आहे, पण देशासाठी क्रिकेट न खेळता लाबं राहण्याची वेदना सहन नाही करु शकत असं त्यांना सांगितलं होतं', असं इरफानने पत्रात लिहिलं आहे.
 
'ज्याप्रकारे सर्व अडचणींचा सामना करत भारतीय संघात पुन्हा कमबॅक केलं, त्याप्रमाणे करिअरमधील हा अडथळाही पार करेन', असा विश्वास इरफानने व्यक्त केला आहे.
 
'मेहनतीच्या आधारे मी पुन्हा फक्त क्रिकेट खेळायला सुरुवात नाही केली, तर संघात स्थानही मिळवलं. करिअरमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला असला तरी मी हार मानली नाही. माझं व्यक्तिमत्व असंच असून कायम असंच राहिल. आता माझ्यासमोर हा अडथळा असून यातूनही मी बाहेर पडेन', असं म्हणत इरफानने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 
 
गेल्या आयपीएल सीजनमध्ये इरफान पठाण रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला होता. यावेळी मात्र त्याला संघात स्थान मिळालं नाही.