शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इराणी ट्रॉफी शेष भारताकडे

By admin | Updated: January 25, 2017 00:31 IST

वृद्धीमान साहाचे द्विशतक (२०३) व चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ११६ धावांच्या जोरावर शेष भारत संघाने गुजरातचा सहा गडी राखून पराभव

मुंबई : वृद्धीमान साहाचे द्विशतक (२०३) व चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ११६ धावांच्या जोरावर शेष भारत संघाने गुजरातचा सहा गडी राखून पराभव करत इराणी ट्रॉफी पटकावली.साहाने १२३ तर पुजाराने ८३ धावांवरुन आज सुरुवात केली. पुजारा व साहा यांनी पाचव्या गड्यासाठी ३१६ धावांची भागीदारी केली. स्पर्धेच्या इतिहासातील ही दूसऱ्या क्रमांकाची भागीदारी आहे. यापुर्वी रवि शास्त्री व प्रविण आम्रे यांनी १९९० मध्ये शेष भारताविरुद्ध चौथ्या क्रमांकासाठी ३२७ धावांची भागीदारी केली होती.रणजी विजेत्या गुजरातच्या गोलंदाजांनी या दोन्ही फलंदाजांना विशेष अडचणीत आणले नाही. पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतलेल्या गुजरातने कठीण लक्ष्य दिले होते. मात्र या दोघांच्या फलंदाजीसमोर हे अवघड लक्ष्य एकदम सोपे बनले. पुजाराने २३० चेंडूचा सामना केला तर साहाने २७२ चेंडूचा सामना केला.शेष भारताचा विजय कालच निश्चित झाला होता. शेष भारताचा संघ एकवेळेस चार बाद ६३ धावांवर लडखडला होता. मात्र साहा व पुजाराने संघाला अडचणीतून बाहेर काढले. गुजरातने पहिल्या डावात ३५८ तर शेष भारतने २२६ धावा केल्या होत्या. गुजरातने दुसऱ्या डावात २४६ धावा करत शेष भारतला ३७९ धावांचे लक्ष्य दिले होते. शेष भारताने १९ पैकी १५ वेळा इराणी ट्रॉफी जिंकली आहे. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक-गुजरात पहिला डाव १०२.५ षटकांत सर्वबाद - ३५८़, दुसरा डाव ९०.३ षटकात सर्वबाद २४६ धावा. शेष भारत पहिला डाव : ७५ षटकांत सर्व बाद २२६ धावा़,दुसरा डाव १०३ .१ षटकांत ४ बाद ३७९ धावा. (चेतेश्वर पुजारा नाबाद ११६, वृद्धिमान साहा नाबाद २०३ हार्दिक पटेल २/१०४)़