शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास

By admin | Updated: May 11, 2016 02:42 IST

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास होण्यास मदत मिळत आहे. यंदाची स्पर्धा यापेक्षा वेगळी नाही. या खेळात सातत्याने बदल होत असतात.

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास होण्यास मदत मिळत आहे. यंदाची स्पर्धा यापेक्षा वेगळी नाही. या खेळात सातत्याने बदल होत असतात. कर्णधार प्रतिस्पर्धी फलंदाजांना बुचकळ्यात टाकण्यासाठी सातत्याने गोलंदाजीमध्ये बदल करीत असतो. फलंदाजांना अंदाज येऊ नये, यासाठी गोलंदाजही गोलंदाजी करताना दिशा व टप्पा यामध्ये बदल करीत असतो. टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक डावाची तीन टप्प्यांत विभागणी होते. १ ते ६ षटकांदरम्यान पॉवर प्ले, ७ ते १५ षटकांदरम्यान मध्य डाव आणि १६ ते २० षटकांदरम्यान डेथ ओव्हर्स. त्यात सहभागी आठ संघ खेळाच्या प्रत्येक विभागात कशा प्रकारची रणनीती वापरतात, याची उत्सुकता आहे. सुरुवातीची सहा षटके गोलंदाजांच्या बचावाची असतात. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध असताना तुम्ही त्या वेळी धावगतीवर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करता. काही कर्णधार पॉवर प्लेमध्येही आक्रमक क्षेत्ररक्षण सजवून विकेट मिळवण्यास पसंती देतात. पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी अनुभवाला मिळणे स्वाभाविक झाले आहे. अशा परिस्थितीत फलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीपासून रोखणे महत्त्वाचे ठरते. मधल्या षटकांमध्ये उभय संघ खेळाचे स्वरूप समजून घेण्यास प्रयत्नशील असतात आणि लय मिळवण्याची संधी शोधत असतात. या षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचे लक्ष स्कोअर वाढविण्यावर असते, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा भर धावा रोखण्यावर असतो. या कालावधीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारापुढे केव्हा आक्रमक पवित्रा स्वीकारायचा, याचे आव्हान असते. जर आक्रमक पवित्रा स्वीकारला तर विकेट मिळवता येतात आणि मोठी भागीदारीही संपुष्टात आणता येते. योग्य वेळी आक्रमण झाले तर विजय तुमचा आणि निर्णय चुकला तर पराभव निश्चित असतो. डेथ ओव्हर्स म्हणजे बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे असतात. तेथे वेगाने चाल खेळणे आवश्यक असते. फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार करता डेथ ओव्हर्समध्ये पारंपरिक क्रिकेटच्या फटक्यांच्या माध्यमातून धावा वसूल करणे प्रभावी ठरते. गरजेपेक्षा अधिक वेगळा प्रयत्न करून काही चौकार-षटकार वसूल करता येतात, पण त्या प्रयत्नात अधिक डॉट चेंडू खेळले जातात. डावाच्या या टप्प्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा गोलंदाज व कर्णधार यांच्यादरम्यान प्रभावी संवाद असणे आवश्यक ठरते. गोलंदाजी कुठे करायची, हे निश्चित झाल्यानंतर क्षेत्ररक्षण सजवता येते. अखेरच्या टप्प्यात फलंदाज बॅट फिरवत असताना रणनीती व योजना कशा अपयशी ठरतात, याबाबत उत्सुकता असते. अखेर प्रत्येक टप्प्याचा विचार केल्यानंतर शेवटी योजना आखणारा आणि दडपणाखालीही त्या यशस्वी करणारा संघ विजयी ठरतो. (टीसीएम)