शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वादाच्या भोवऱ्यात आयपीएल...

By admin | Updated: July 15, 2015 01:10 IST

गुणावान क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे यासाठी सुरु करण्यात आलेली इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धा कायमच वादात राहिली आहे. मॅच फिक्सिंग, खेळाडूंचे वर्तन

मुंबई : गुणावान क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे यासाठी सुरु करण्यात आलेली इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धा कायमच वादात राहिली आहे. मॅच फिक्सिंग, खेळाडूंचे वर्तन व नियमांचे पालन न केल्याने काही संघांवर करण्यात आलेली कारवाई अशा विविध वादाच्या भोवऱ्यात आयपीएल गटांगळ््या खात असल्याचे चित्र आहे. भारताला २००७ सालच्या विश्वचषक स्पर्धेत मानहानीकारक पराभवाचे तोंड पहावे लागले होते. त्यानंतर बीसीसीआयने गुणवान खेळाडूंना व्यासपीठ मिळावे व त्याचा फायदा भारतीय क्रिकेटला व्हावा या साठी आयपीएल सुरु कले. अर्थात त्या पूर्वी एस्सेल ग्रुपने नुकतेच इंडियन क्रिकेट लीग सुरु केले होते. मात्र बलाढ्य बीसीसीआयची धन ताकद व प्रभावा समोर ही लीग लवकरच बसनात गुंडाळल्या गेली. आयपीएलला पदार्पणातच मोठी प्रसिद्धी व लोकप्रियता मिळाली. ललित मोदी यांनी आयपीएलची सुरुवात केली. लाखो डॉलरमध्ये ८ संघांची विक्री झाली. त्या वेळी महेंद्रसिंह धोणी हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. इंडिया सिमेंटची मालकी असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा तो एक भाग झाला. सुरुवातीस एकत्र असलेले मोदी व इंडिया सिमेंटचे तत्कालिन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यातील दुरावा वाढला. पाठोपाठ दुसऱ्याच वर्षी आयपीएलचे आयोजन वादात सापडले. देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे त्या वेळी स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आली. पुढील वर्षी स्पर्धा पुन्हा भारतात झाली. मात्र त्या वेळी आर्थिक अनियमिततेमुळे मोदी यांना आयपीएल मधूनच नव्हे तर बीसीसीआयमधून दूर सारण्यात आले. आता अंडर वर्ल्डकडून धोका असल्याने मोदी लंडनमध्ये जाऊन बसले आहेत. सुरुवातीला डेक्कन चार्जर्स संघाची जागा सनरायझर्स हैदराबादने घेतली. केरला टस्कर व सहारा पुणे वॉरियर्स या संघांना आयपीएल नियमांचे पालन न केल्याने बीसीसीआयने त्यांची मान्यता रद्द केली. मैदानाबाहेरील वाद सुरु असताना मैदानातील वादही समोर येत होते. हरभजन सिंग व श्रीसंत यांची ‘थप्पड की गुंज’ चर्चेत राहिली. फिक्सिंग प्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली. आता तर खुद्द चेन्नई सुपर किंग्जचे मालक गुरुनाथ मयप्पन व राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा यांच्यावर सट्टेबाजीचे आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर न्यायालयाने आजीवन बंदी घातली आहे. (वृत्तसंस्था)