शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल पुन्हा एकदा फिक्सिंगच्या जाळ्यात

By admin | Updated: May 12, 2017 21:47 IST

विविध वादंगात अडकलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फिक्सिंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ऑनलाइन लोकमत मुंबई/कानपूर / नवी दिल्ली - विविध वादंगात अडकलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फिक्सिंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कानपूर येथे झालेल्या गुजरात लायन्स विरुध्द दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्यादरम्यान कानपूर पोलिसांनी पंचतारांकीत हॉटेलमधून एका माजी क्रिकेटपटूसह तिघांना बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे सट्टेबाजांसह दोन क्रिकेटपटूंच्या संपर्कात होता अशी कबुली त्याने कानपुर पोलिसांना दिली आहे. माजी क्रिकेटपटू नयन शाह, ग्रीनपार्क स्टेडीयम कर्मचारी रमेश कुमार आणि एजेंट विकास चौहान अशी अटक आरोपींची नावे आहेत.

मुळचा ठाणे येथील रहिवासी असलेला शाह याने १७ व १९ वर्षांखालील स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. बुधवारी १० मेला झालेल्या गुजरात वि. दिल्ली सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर पोलिसांनी हॉटेल लँडमार्कच्या १७ व्या मजल्यावरील रुम नंबर १७३३ मध्ये छापा टाकला. तेथून शाहसह कुमार आणि चौहाणच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पोलिसांनी ४ लाख ७० हजार रुपयांसह पाच मोबाईल आणि विविध रजिस्टर बुक जप्त केले आहेत. या रजिस्टर बुकमधून पोलिसांची हाती महत्त्वाची माहिती लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नयन हा अजमेर येथील बुकी ‘बंटी’ याच्या सतत संपर्कात होता. बंटीच्या सांगण्यावरुन तो हा सट्टेबाजार चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच तो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अन्य दोन क्रिकेटपटूंच्याही संपर्कात असल्याची धक्कादायब माहितीही समोर आली आहे. हे दोन क्रिकेटपटू कोण आहे याचे गूढ अद्याप कायम आहे. 

नयनने ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर अतिरिक्त पाण्याचा मारा करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यासाठी त्याने ग्रीनपार्क स्टेडीयमचा कर्मचारी असलेल्या कुमारची मदत घेतली. या कारवाईनंतर आफ्रिकेहून आलेला आणि गुजरातमध्ये ठाण मांडून बसलेला बुकी आणि यामागील मास्टरमाईंड बुकी बंटीच्या अटकेसाठी तपास सुरु केला आहे. दोघांना अटक करण्यासाठी विशेष टीम रवाना करण्यात आली आहे. अटक आरोपींकडे मॅच फिक्सिंग बाबतची चौकशीही सुरु करण्यात आली आहे. नयन शाहने दिलेल्या माहितीनुसार, नयनने आयपीएल सामन्यांसाठी मोठ्या सट्टेबाजांकडून एक काँट्रॅक्ट घेतले होते. तसेच, खेळपट्ट्यांची माहिती देण्यासाठी सट्टेबाज त्याला दिड लाख रुपये द्यायचे. हे काम तो ग्रीनपार्क स्टेडियमचा कर्मचारी रमेश कुमारच्या मदतीने करायचा. नयनने पुढे अशीही माहिती दिली की, त्याच्या सुचनेनुसार रमेश खेळपट्टीवर अतिरिक्त पाण्याचा मारा करायचा. या कामासाठी नयन रमेशला २० हजार रुपये द्यायचा. दरम्यान, नयनच्या मोबाईलमधून वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीचेही फोटो मिळाले आहेत. ‘या तिघांवर कारवाई करण्याआधी आम्ही स्थानिक पोलिसांची मदत घेतली. या तिन्ही व्यक्तीच्या प्रत्येक हालचालींवर आम्ही बारिक लक्ष ठेवून होतो. आमच्याकडे तपासणी परवाना नसल्याने कानपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.’ - नीरज कुमार, बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी समितीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त अशी दिली जायची माहिती..ग्रीनपार्क स्टेडीयमचा कर्मचारी असलेला रमेश कुमार हा खेळपट्ट्यांचे फोटो आणि स्थिती नयनला पुरवायचा. या माहितीच्याआधारे आयपीएल सामन्यांवर सट्टे लावले जायचे. कानपुरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश कुल्हारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही आरोपींकडे कसून चौकशी सुरु आहे. तसेच या दिवसांमध्ये आरोपींना हॉटेलमध्ये कोण कोण भेटले याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात येत आहे. ते कोणाच्या संपर्कात होते याचाही अधिक तपास सुरु आहे.